Sant Gahininath : संत गहिनीनाथांच्या समाधीवर जिहाद्यांचे अतिक्रमण, स्थानिक हिंदूंनी उधळला डाव

हिंदूंनी अतिक्रमण काढून फडकावले भगवे ध्वज

197
Sant Gahininath : संत गहिनीनाथांच्या समाधीवर जिहाद्यांचे अतिक्रमण, स्थानिक हिंदूंनी उधळला डाव
Sant Gahininath : संत गहिनीनाथांच्या समाधीवर जिहाद्यांचे अतिक्रमण, स्थानिक हिंदूंनी उधळला डाव

जळगावमधील छत्रपती शिवाजीनगर (Chhatrapati Shivajinagar) भागातील संत गहिनीनाथ (Sant Gahininath) यांच्या समाधीवर अतिक्रमण करण्याचे जिहाद्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. संत गहिनीनाथ (Sant Gahininath) यांची समाधी १०० वर्ष जुनी आहे. मात्र समाधीस्थळावर घरे, दुकाने आणि हॉटेल झाल्यामुळे समाधीस्थळ दुर्लक्षित झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम तरुणांकडून या समाधीवर हिरवी चादर चढवली जात होती. तसेच नमाजठण ही मुस्लिम तरुणांकडून केली जात होती.

( हेही वाचा : भारत जगात महासत्ता बनेल; ब्रिटनचे माजी पंतप्रधान Tony Blair यांचे वक्तव्य

मात्र या तरुणांकडून येथे भिंत बांधत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्याने स्थानिक हिंदूनी त्यांना विरोध केला. दि. ३० सप्टेंबर रोजी हिंदू महिला आणि तरुण यांनी त्या जिहादी तरुणांना खडसावले, तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. दि. १ ऑक्टोबर या दिवशी पुन्हा एका मुलाने तेथे येऊन, ‘ येथील पीर माझ्या स्वप्नात आला होता. त्याने मला हे करण्यास सांगितले’ असे सांगितले. पण स्थानिक हिंदूंनी अतिक्रमण काढून तिथे पुन्हा भगवे झेंडे आणि दीपप्रज्वलन केले. घटनेतील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Sant Gahininath)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.