Israeli Embassy in India : भारतातील इस्त्रायली दूतावासाच्या सुरक्षेत वाढ, इस्त्रायल- इराण तणावाची पार्श्वभूमी

121
Israeli Embassy in India : भारतातील इस्त्रायली दूतावासाच्या सुरक्षेत वाढ, इस्त्रायल- इराण तणावाची पार्श्वभूमी
Israeli Embassy in India : भारतातील इस्त्रायली दूतावासाच्या सुरक्षेत वाढ, इस्त्रायल- इराण तणावाची पार्श्वभूमी

इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाची (Israeli Embassy in India) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने पोलिस सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल दूतावासात दिल्ली पोलिसांची टीम नेहमीच तैनात असते, मात्र इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढल्याने सुरक्षा दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा : केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटींची मदत; CM Eknath Shinde यांची माहिती

भारताचे इस्त्रायलशी मैत्रीपूर्ण संबंध असूनही इथल्या मुस्लिम समुदायाचे लोक इस्त्रायलला आपला कट्टर शत्रु मानतात. त्यामुळे इस्त्रायलने हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरुल्लाह याला ठार केल्यानंतर भारतात मुस्लीम समुदायाकडून तीव्र निदर्शने केली. नसरुल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरच्या कारगिल आणि बडगाममध्ये इस्रायलविरोधात निदर्शने झाली. यासोबतच उत्तरप्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यांमध्ये देखील मुस्लिमांनी इस्त्रायल विरोधात आंदोलन केले.

नसरुल्लाहच्या मृत्यूमुळे संतापलेल्या इराणने दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे २०० क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यापैकी बहुतांश क्षेपणास्त्र इस्त्रायलने आपल्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने हवेतच नष्ट केली. परंतु, इराणच्या या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ज्यामुळे भारताने इस्त्रायली दूतावाताच्या (Israeli Embassy in India) सुरक्षेत वाढ केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.