कुलाबा कॉजवे सुशोभीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज कुलाबा कॉजवे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेरीवाला स्टॉलचे उद्घाटन केले. स्टँडर्ड हॉकिंग स्टॉल्स आणि दुकानाच्या नावाचे फलक यातून कुलाबा कॉजवेचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. विशेष म्हणजे फेरीवाला धोरणात फेरीवाल्यांना ३ बाय ३ फूट जागा देण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात फेरीवाला स्टॉलचे आकारमान ५ बाय ३ फूट एवढे आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणात हे स्टॉल बसवणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Colaba Causeway)
(हेही वाचा- Sant Gahininath : संत गहिनीनाथांच्या समाधीवर जिहाद्यांचे अतिक्रमण, स्थानिक हिंदूंनी उधळला डाव)
पर्यटनाला चालना देणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट
या पथदर्शी स्टॉलचे उद्घाटन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, या स्टॉलची रचना एका तज्ज्ञाने केली आहे. स्थानिक फेरीवाल्यांसाठी लागणारी सोय अधोरेखित केली आहे. कॉजवेच्या बाजूने स्टॉल्स आणि दुकानाच्या नावाचे फलक यांचे स्वरूप प्रमाणित करणे आणि पर्यटनाला चालना देणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त, कॉजवेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रहिवाशांना दिलासा देण्यासाठी योजना आहेत, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सांगितले. (Colaba Causeway)
हॉकिंग स्टॉल्स व्यतिरिक्त, या प्रकल्पात फुटपाथ सुधारणे आणि पर्यटकांना परिसराचे आकर्षण वाढविण्यासाठी नवीन विद्युतयोजना बसवणे यांचा समावेश आहे. या पथदर्शी स्टॉलला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास असे आणखी १८७ स्टॉल्स खरेदी केले जातील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फेरीवाला स्टॉल्ससाठी २.५ कोटी दिले होते. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी सांगितले. (Colaba Causeway)
कसा आहे स्टॉल आणि तो कोणाला दिला
आजचा हा पहिला पथदर्शी स्टॉल ५१ वर्षीय मुनावर अली यांना देण्यात आला. ते गेल्या 28 वर्षांपासून कॉजवे येथे रेडिमेड कपड्यांचा स्टॉल चालवतात. कुलाबा कॉजवे टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आम्हाला हा आधुनिक स्टॉल मिळवून दिल्याबद्दल आभारी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यात पावसासाठी शेड सुद्धा आहे. या ५x३फुटांच्या स्टॉलमध्ये आमचे सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागेची सोय केली आहे. स्टॉलमध्ये खाली चाके असल्यामुळे हलविण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे, असेही अली यांनी नमूद केले. (Colaba Causeway)
कुलाबा कॉझवे सुशोभीकरण प्रकल्प महापालिकेने रखडवला – मकरंद नार्वेकर
भाजपचे माजी नगरसेवक ॲड मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) सुशोभीकरण प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला. सुशोभीकरणामध्ये पादचारी मार्ग, ज्याला यापूर्वी महापालिकेने मंजुरी दिली होती आणि त्यासाठी निधीही मंजूर केला होता, पण तो आता कोणत्याही कारणाशिवाय रखडवून ठेवला आहे, असे मकरंद नार्वेकर यांनी नमूद केले. (Colaba Causeway)
विलंबाबद्दल संताप
ॲड मकरंद नार्वेकर यांनी नुकतेच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून निधी स्थगित केल्याने आणि त्याचा कुलाब्यातील रहिवाशांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत भीती व्यक्त केली आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुलाबा कॉजवे गतवैभव प्राप्त करून देण्यावर त्यांनी भर दिला. परंतु, त्यांच्याकडून होत असलेल्या विलंबाबद्दल संताप व्यक्त करत प्रकल्पाची सुरळीत प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही अडचणी किंवा समस्या कळवाव्यात असेही आवाहन पालिकेला केले आहे. (Colaba Causeway)
हेही पहा-