सिंधुदुर्गातील आडाळी (Adali MIDC) येथे लवकरच एमआयडीसी कार्यान्वित केली जाणार आहे. याठिकाणी फार्मा उद्योजकांसाठी जागा उपब्लध करून दिली जाणार आहे. आडाळी येथील एमआयडीसीसाठी (MIDC) राज्य सरकारने ११ हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली असल्याची माहितीही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी बुधवारी दिली. एमआयडीसीच्या माध्यमातून कोकणात रोजगारसंधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Adali MIDC)
सिंधुदुर्ग येथील आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील (Adali Industrial Area) सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या ‘रामटेक’ या शासकीय निवासस्थानी बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू (P. Velarasu), शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा, फार्मा उद्योजक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी ही घोषणा केली. (Adali MIDC)
(हेही वाचा – Colaba Causeway येथे १८७ आंतरराष्ट्रीय हॉकिंग स्टॉलचे; विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन)
कोकणामध्ये उद्योग येत असताना काही लोक त्याला विरोध करतात. पण आता ही मानसिकता बदलली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतलेला पुढाकार अतिशय महत्त्वाचा आहे. वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी आवश्यक ती मदत आपण देऊ. औषधनिर्मिती क्षेत्रातील सर्वांचे आम्ही स्वागत नक्कीच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही पाहा –