-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघ घरातील न्यूझीलंड विरुद्धची मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यासाठी तयारी करत असताना अचानक महत्त्वाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) बोर्डर – गावसकर चषकात खेळू शकणार नसल्याची बातमी पसरली होती. आधीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी रिहॅबिलिटेशन सुरू असताना त्याच्या गुडघ्यांना सूज येत असल्याचं बाहेर पसरलं होतं. पण, आता शामीनेच समोर येत या बातमीचं खंडन केलं आहे. मी किंवा बीसीसीआयने अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नसताना, खोटी बातमी पसरवली जात आहे, असं शामीने ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे.
(हेही वाचा- महाराष्ट्रातील ‘ही’ Vande Bharat Express होणार बंद ? जाणुन घ्या काय आहे कारण)
मुख्य तेज गोलंदाज मोहम्मद शमी पायाच्या दुखापतीनंतर रिहॅबमध्ये असतानाच गुडघे सुजण्याची तक्रार सुरू झाली आहे. त्यामुळे आणखी काही आठवडे त्याला विश्रांती लागेल असं समोर आलं आहे. त्याला बरं व्हायला आणखी ६ ते ८ आठवडे लागू शकतात, अशी बातमी सगळीकडे प्रसिद्धही झाली होती. (Mohammed Shami)
Why these type of baseless rumors? I’m working hard and trying my level best to recover. Neither the BCCI nor me have mentioned that I am out of the Border Gavaskar series. I request the public to stop paying attention to such news from unofficial sources. Please stop and don’t… pic.twitter.com/0OgL1K2iKS
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) October 2, 2024
‘मी दुखापतीतून सावरण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे. मी किंवा बीसीसीआयने माझ्या दुखापतीचा कुठलाही अपडेट दिलेला नसताना अशा बिनबुडाच्या बातम्या छापून लोकांना काय मिळतं? मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनी अशा बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अधिकृतपणे आलेली बातमीच खरी असते. अशा फेकन्यूजना बळी पडू नका,’ असं मोहम्मद शमीने आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. (Mohammed Shami)
(हेही वाचा- Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचं शतक हुकलं, पाहा कसा विचित्र पद्धतीने बाद झाला अजिंक्य)
शामी सध्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. नेट्समध्ये गोलंदाजीला त्याने सुरुवात केल्याचं समजतंय. शिवाय १३ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या रणजी हंगामात तो बंगालकडून खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. (Mohammed Shami)
गेल्यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर शामी खेळलेला नाहीए. त्याच्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्यावर फेब्रुवारी महिन्यात त्याने शस्त्रक्रिया करून घेतली. (Mohammed Shami)
(हेही वाचा- Adali MIDC : सिंधुदुर्गवासीयांसाठी खुशखबर! लवकरच उभारणार नवी एमआयडीसी )
खेळाडूंवर खेळाचा ताण कमी व्हावा यासाठी बंगळुरूतील अकादमी विशेष प्रयत्न करत असतं. शामीच्या बाबतीही वैद्यकीय पथकाने सुरुवातीला शस्त्रक्रियेऐवजी केवळ काही व्यायाम प्रकार सुचवले होते. पण, चार महिन्यांनंतर अखेर शामीवर इंग्लंडला नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तो खेळात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांत आहे. बुमरा आणि शामी हे मुख्य तेज गोलंदाज सलग पाच कसोटी सामने खेळू नयेत यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असतं. (Mohammed Shami)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community