Neeraj Chopra : नीरज चोप्राची आई जेव्हा पंतप्रधान मोदींना चुरमा पाठवते….

133
Neeraj Chopra : नीरज चोप्राची आई जेव्हा पंतप्रधान मोदींना चुरमा पाठवते….
Neeraj Chopra : नीरज चोप्राची आई जेव्हा पंतप्रधान मोदींना चुरमा पाठवते….
  • ऋजुता लुकतुके 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भालाफेकीतील भारतीय स्टार नीरज चोप्राच्या आईला पत्र लिहून त्यांनी पाठवलेल्या चुरम्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत. नीरजची आई सरोज देवी यांनी नवरात्री सणाच्या पूर्वसंध्येला मोदींना गुजराती पदार्थ चुरमा पाठवला होता. नुकताच नीरज बुडापेस्ट इथं डायमंड्स लीगच्या अंतिम स्पर्धेत रौप्य जिंकून मायदेशी परतला आहे. त्यानंतर पंतप्रधानांची घेताना त्याने आईने बनवलेला चुरमा त्यांच्यासमोर पेश केला होता. त्यावर पंतप्रधानांनी स्वत: पत्र लिहून आईचे आभार मानले आहेत. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- आता पाकिस्तानची कुठलीही ‘नापाक’ हरकत India Airforce च्या रेंजमध्ये!)

सरोज देवी यांच्या चुरम्यामुळे आपल्याला आईची आठवण झाली, असं पंतप्रधानांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. ‘तुम्ही निरोगी, सुरक्षित आणि आनंदी असाल अशी आशा करतो. जमैकाचे पंतप्रधान सध्या भारतात आहेत. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात माझी भाऊ नीरज यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला तुम्ही स्वत: बनवलेला चुरमा भेट म्हणून दिला. तो आज सकाळी मी चाखला आणि मला माझ्या आईची आठवण झाली,’ असं पंतप्रधानांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलं आहे.  (Neeraj Chopra)

पुढे ते लिहितात, ‘नीरज भाई मला नेहमी तुमच्या हातच्या चुरम्याबद्दल सांगायचे. त्यामुळे मीच एकदा गंमतीत त्यांना विनंती केली होती. त्यांनी आठवण ठेवून माझ्यासाठी चुरमा आणला. आज मी तो चाखल्यावर थोडा भावूक झालो. कारण, मला आईची आठवण झाली. नवरात्रीत माझा उपास असतो. सकाळी तुमचा चुरमा खाऊनच मी उपास सुरू केला आहे.’  (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Adali MIDC : सिंधुदुर्गवासीयांसाठी खुशखबर! लवकरच उभारणार नवी एमआयडीसी   )

पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली होती. त्यावेळी नीरजकडे, आपल्याला अजून चुरमा मिळालेला नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने रौप्य जिंकलं. ऑलिम्पिकहून परतलेले खेळाडू ऑगस्ट महिन्यातच पंतप्रधान मोदींना भेटले होते. पण, तेव्हा डायमंड्स लीगसाठी नीरज युरोपमध्येच थांबला होता. तिथेही अंतिम फेरीत नीरजने ८८.४७ मीटरच्या फेकीसह रौप्य पटकावलं. आणि भारतात परतल्यावर त्याने बुधवारी पंतप्रधानांची भेट घेतली. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.