Kho Kho News : राष्ट्रीय सब-ज्युनिअर खोखो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट 

Kho Kho News : राज्याच्या किशोर संघाने सलग नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे

122
Kho Kho News : राष्ट्रीय सब-ज्युनिअर खोखो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट 
Kho Kho News : राष्ट्रीय सब-ज्युनिअर खोखो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट 
  • ऋजुता लुकतुके 

झारखंडच्या पुष्पुर इथं अल्बर्ट एक्का स्टेडियमवर (albert ekka stadium) सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपदासह दुहेरी सुवर्ण मुकुट मिळवला आहे. किशोर गटाचे हे सलग ९वे तर किशोरी गटाचे ७ वे विजेतेपद आहे. साताराच्या प्रसाद बळीपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार तर सांगलीच्या वेदिका तामखडेला इला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  (Kho Kho News)

(हेही वाचा- Anurag Thakur म्हणाले- काँग्रेसची आश्वासने खोटी; ते दंगलखोर-खंडणीखोरांच्या भरोवशावर)

महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा हा मुलांचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा व चुरशीचा झाला. या सामन्यात मध्यंतराला १ गुणाने पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने हा सामना अखेर २४-१५ असा ९ गुणांनी जिंकला. महाराष्ट्रा कडून भीमसिंग वसावे २ मि. संरक्षण व १ गडी, श्री दळवी १.१० मि. संरक्षण व १ गडी, प्रसाद बळीप १, २ मि. संरक्षण व ३ गडी, सचिन थोरात १.१०, १ मि. संरक्षण व १ गडी, विनायक भांगे १.२० मि. संरक्षण अशी सांघिक कामगिरी करत हा सामना जिंकला. तर तेलंगणाच्या सुंदरने १ मि. संरक्षण करून ८ गडी बाद करून सामन्यात चुरस निर्माण केली होती.  (Kho Kho News)

महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८ गुणांनी सहज विजय मिळवला. मध्यंतराला १४-४ अशी आघाडी घेत महाराष्ट्रने २६-८ असा सामना जिंकला. महाराष्ट्राकडून वेदिका तामखडेने पहिल्या डावात ५ मिनिटे संरक्षण केले. तिला सिद्धी भोसले १.३० मि. संरक्षण ३.५० मि. संरक्षण व ५ खेळाडू बाद करत मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद ३ मि. संरक्षण करताना २ खेळाडू  बाद केले तर गौरी जाधवने ३ खेळाडू बाद केले. तर कर्नाटकच्या इंच्रा २, १.५ मि. संरक्षण करून 4 खेळाडूंना बाद केले व गौतमीने १,१.४० मि. संरक्षण करून चांगली लढत दिली. (Kho Kho News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.