Crime : थायलंडमधून मुलींची तस्करी, उल्हासनगरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश १५ मुलींची सुटका

178
Gangster Satish Kalia वर गुन्हा दाखल; पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

थायलंड देशातील तरुणींना मुंबईत आणून त्यांच्यामार्फत सेक्सरॅकेट चालविणाऱ्या उल्हासनगरमधील एका लॉजिग बोर्डिंगचा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश करून १५ थाय तरुणीची या ‘सेक्सरॅकेट’मधून सुटका केली आहे. हे ‘सेक्स रॅकेट’ चालविणाऱ्या लॉजिग-बोर्डिंगच्या मॅनेजरसह चार जणांना अटक करून ५ लाख २७ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. (Crime)

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या ठिकाणी असलेल्या ‘सितारा लॉजिग अँड बोर्डिंग या ठिकाणी परदेशी तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगर येथील हॉटेलमध्ये बोगस ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर मंगळवारी रात्री सितारा लॉजिग बोर्डिंग येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी थायलंड देशाच्या तरुणी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या, पोलिसांनी १५ थाय तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली, तसेच लॉजिग बोर्डिंग मालक, मॅनेजरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करून मॅनेजरसह ४ जणांना अटक करण्यात आली. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

(हेही वाचा – Stamp Paper: आता १०० आणि २०० रुपयांचे स्टँप पेपर इतिहासजमा होणार; राज्य सरकारचा निर्णय)

पोलिसांच्या तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे, सितारा लॉजिग बोर्डिंगमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते, थायलंड येथून थाय तरुणींची तस्करी करून त्यांना आर्थिक लाभाचे अमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसायात लोटून त्यांच्या मार्फत सेक्सरॅकेट चालविण्यात येत होते, थाय तरुणी बड्या व्यवसायिकाना पुरवल्या जात होत्या व लाखो रुपये कमावले जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगचे व्यवस्थापक कुलदीप उर्फ ​​पंकज जयराज सिंग (३७) यांच्यासह चार साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(१) आणि १४३(३) अन्वये तसेच अनैतिक वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिबंध) कायदा 1956 कायदा अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.