-
ऋजुता लुकतुके
संयुक्त अरब अमिरातीत यंदाचा आयसीसी महिला टी-२० विश्वचषक गुरुवारपासून सुरू होणार आहे. दुबई आणि शारजा या दोन शहरांत हे सामने होणार आहेत. दुबईत गुरुवारी सहभागी संघांच्या कर्णधारांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कॅप्टन्स डे इव्हेंट असं त्याचं नाव होतं. भारतीय कर्णधार हरमनप्रीतने यावेळी पत्रकारांशी बोलताना, सातत्यपूर्ण कामगिरीवर भर दिला. ‘या खेळात सतत काहीतरी शिकावं लागतं. त्याचं महत्त्व आम्हाला समजलं आहे,’ असं ती म्हणाली. (ICC Women’s T20 World Cup)
(हेही वाचा- Rahul Gandhi यांच्या खोट्या नरेटिव्हला काँग्रेसी नेतेही पुढे नेतात; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस नेत्यावर टीका)
‘एखाद्या दिवशी तुम्हाला वाटतं, तुम्ही कमाल कामगिरी केली आहे. पण, पुढचा दिवस नवीन आव्हानं घेऊन येतो. त्यासाठी तयार राहणं जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे वाढ आणि सुधारणा या दोन गोष्टींवर भारतीय खेळाडूंनी सध्या लक्ष केंद्रीत केलं आहे,’ असं हरमनप्रीतने स्पष्ट केलं. प्रत्येक सामना तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, असंच तिने पुन्हा पुन्हा ठासून सांगितलं. (ICC Women’s T20 World Cup)
The captains unwind before the battle begins at the Women’s #T20WorldCup
🤩🔥#WhateverItTakes pic.twitter.com/2NHQ8ZAjpq— T20 World Cup (@T20WorldCup) October 2, 2024
भारतीय संघाची तयारी मात्र चोख असल्याचं हरमनप्रीतला वाटतं. ‘माझ्याबरोबर चौदा अशा मुली आहेत ज्या मेहनती आहेत. आणि क्रिकेटला वाहिलेल्या आहेत. आम्हाला आता कामगिरीत फक्त पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी हा संघ तयार आहे,’ असं हरमनप्रीत म्हणाली. भारतीय संधाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध दुबईत होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना हा ६ ऑक्टोबरला आहे. या स्पर्धेत १० संघांमध्ये २२ सामने होणार आहेत. (ICC Women’s T20 World Cup)
Two falcons 🦅
Two camels 🐫
10 captains 😎
ONE trophy 🏆It’s all happening in the UAE! #T20WorldCup #WhateverItTakes pic.twitter.com/jpHKibbe7r
— T20 World Cup (@T20WorldCup) October 2, 2024
३ ऑक्टोबरपासूनच ही स्पर्धा सुरू होत आहे. आणि पहिल्या दिवशी स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेश तसंच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असे सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियन महिलांनी तब्बल ६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आताही त्यांचंच मुख्य आव्हान इतर संघांसमोर असणार आहे. (ICC Women’s T20 World Cup)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community