काही दिवसांपूर्वी सायबर गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) बोगस आभासी न्यायदालन तयार करून त्याद्वारे एका बड्या उद्योपतीला ७ कोटींचा गंडा घातला होता. त्यानंतर आता चित्रपटातील कथानकाप्रमाणे सायबर गुन्हेगारांनी बँकिंग फसवणूक करत चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) बनावट शाखा सुरु केली. या घोटाळ्यामध्ये बेकायदेशीर नियुक्ती, बनावट प्रशिक्षण सत्रे राबवत बेरोजगार व्यक्तींची आणि स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक करण्यासाठी सेटअप तयार करण्यात आला होता.
( हेही वाचा : Middle East Tension : मध्य-पूर्वेतील अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय आणि कसा परिणाम होतोय?)
हे प्रकरण छत्तीसगडची राजधानी रायपूरुपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सक्ती जिल्ह्यात छपोरा नावाच्या गावात घडले. देशातील एसबीआयची (SBI) सर्वात मोठी बनावट बँक म्हणून या घटनेनंतर बँकेला नावलौकीक मिळालेले आहे. फक्त १० दिवसांपूर्वी उघडलेल्या बँकेची शाखा एकदम अस्सल बँकेची प्रतिकृती असल्याचं बोललं जातयं. गावातील अनेक जण या बँकेत नव्याने खाती उघडत होते. तर बेरोजगार तरुणही बँकेत नोकरी लागल्याने खुश झाले होते.
दरम्यान अजय कुमार नावाच्या स्थानिक गावकऱ्याला एका रात्रीत उभ्या राहिलेल्या बँकेच्या विश्वासर्हतेवर शंका आली. तसेच डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाला या शाखेविषयी संशय आला. त्यानंतर दि. २७ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी वरिष्ठ पोलिस आणि एसबीआय अधिकारी यांनी बँकेला भेट दिली. तेव्हा बँक (SBI) बनावट असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. दरम्यान शाखेतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांही बनावट होत्या. (SBI) बँकेत कायमस्वरुपी नोकरी देण्यासाठी उमेदवारांकडून २ ते ६ लाखांपर्यंतची लाच ही घेण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगार पीडितांना आर्थिक आणि कायदेशीर अशा दोन्ही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community