Janata NRC : घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव वाढवावा – रणजित सावरकर

174
Janata NRC : घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव वाढवावा - रणजित सावरकर
Janata NRC : घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव वाढवावा - रणजित सावरकर

बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि अन्य घुसखोरांमुळे देश आणि राज्याची सुरक्षा, अर्थव्यवस्था धोक्यात येण्याबरोबरच स्थानिकांच्या रोजगारावरही गदा येत असल्याने राज्य शासनाने या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा वेळ निघून जाईल, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात जवळपास एक कोटी आणि त्यातील ४० लाखांहून अधिक रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर मुंबईत असून देशात त्यांची संख्या जवळपास १० कोटीहून जास्त आहे. हे घुसखोर विभिन्न गुन्हे आणि देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असून त्याचा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, रोजगारावरही परिणाम झाला आहे. अशा घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर, रणजित सावरकर, कर्नल (सेवानिवृत्त) नरेश गोयल सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके (Suresh Chavhanke) यांच्यासह माजी लष्कर, नौदल, हवाई दल, नागरी सेवा दलातील अधिकारी आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मिळून एक मोहीम सुरू केली आहे. सिविल सोसायटी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जनता एनआरसी मुव्हमेंट सुरू झाली असून याला पाठींबा देण्यासाठी 9209 204 204 या मोबाइल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिकांवर उपासमारीची वेळ

गुरुवारी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रणजित सावरकर, राजेंद्र निंभोरकर आणि सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, “गेल्या ३०-३५ वर्षात सुतार, टीव्ही दुरुस्त करणारे, ओला-उबेर टॅक्सी चालक, आंबा, भाजी विक्रेते, मासे विक्रेते या स्थानिकांच्या व्यवसायावर घुसखोरांमुळे अतिक्रमण केले असून स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कदाचित, पुढे १५-२० वर्षांनी या घुसखोरांचे बहुमत होईल आणि त्यांचे सरकारही येईल, या धोक्याची जाणीव सावरकर यांनी करून दिली.

(हेही वाचा – SBI बँकेची बनावट शाखा, बेरोजगार तरुणांनी कायमस्वरुपी नोकरीसाठी दिली लाखोंची लाच)

सरकारवर दबाव

“शासकीय यंत्रणा ही घुसखोरी रोखण्यासाठी अकार्यक्षम असून जनतेचेही हे अपयश आहे,” असे सांगतानाच “जनतेने ठरवले तर सरकारवर दबाव आणून उपाययोजना करण्यास जनता भाग पाडू शकते,” असे सावरकर यांनी स्पष्ट केले.

बांग्लादेशातून घुसखोरी सोपी

निंभोरकर म्हणाले की, देशाची सीमा ज्या चार देशांना लागून आहे त्यात सगळ्यात मोठी सीमा बांग्लादेशची ४,१९८ किमी असून १९७ नद्या जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे घुसखोरी करणे सोपे जाते. ही घुसखोरी रोखण्यासाठी सीमा संरक्षण, ‘लक्ष्मी दर्शन’ न घेता, करणे आवश्यक आहे,” असे निंभोरकर यांनी निदर्शनास आणून दिले.

हजारहून अधिक एफआयआर

सुरेश चव्हाणके यांनी राज्य शासनाकडून राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायद्याची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली. “राज्यातील गृह विभागाच्या एका अहवालानुसार बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोर विरोधात हजारहून अधिक एफआयआर (FIR) विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. नुकतेच उल्हासनगर येथे गेली अनेक वर्ष वास्तव्य करत असलेल्या एका बांग्लादेशी महिलेला तिच्या कुटुंबासहित पकडण्यात आले. तिकडे आसाममध्ये राहणारे ३ लाख घुसखोर बांग्लादेशी तेथील सरकारच्या कडक कारवाईला घाबरून राज्याबाहेर पळून महाराष्ट्र राज्यात आले आहे, अशी आमची माहिती आहे. महाराष्ट्रातून अनधिकृत घुसखोरांनी निघून जावे, अशी आमची मागणी आहे,” असे चव्हाणके म्हणाले.

(हेही वाचा – Kho Kho News : राष्ट्रीय सब-ज्युनिअर खोखो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट )

जनता NRC ची टीम तयार

चव्हाणके पुढे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात जनता NRCची टीम तयार झाली असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना आवाहन करून आपल्या आजूबाजूच्या परिसरात घुसखोर आहेत का? हे पाहिले जाईल. शहरातील वार्ड आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करून आपल्या भागात घुसखोर आहेत का, याचाही शोध घेतला जाईल. या अभियानासाठी आतापर्यंत १८,५०० ग्रामपंचायती आणि ४४ हजार गावांना भेट दिली आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांतील लोक कार्यरत आहेत. राजकीय नव्हे, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने हा विषय पहायला हवा. बांग्लादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालचे म्हणून येथे राहतात. त्यांची खरी ओळख पटावी म्हणून कोलकत्ता येथून १०० नागरिक महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या भाषेवरून ते या घुसखोरांना ओळखणार आहेत आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. हे आंदोलन संपूर्णपणे अराजकीय राहणार असून आम्ही कायदा तोडणार नाही तर गनिमी काव्याने हे आंदोलन करणार आहोत. ज्या आंदोलनामुळे घुसखोरी थांबेल व राज्य घुसखोर मुक्त होईल,” असेही चव्हाणके यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 9209 204 204 या नंबर वर मिस्ड कॉल द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आंदोलनाची अधिक माहिती www.JanataNRC.org वर या संकेतस्थळांवरून घ्यावी, असेही चव्हाणके म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.