Israel एअर स्ट्राईकमध्ये हमास सरकारच्या प्रमुखासह ३ नेते ठार

इस्त्रायल संरक्षण दलाचा दावा

58
Israel एअर स्ट्राईकमध्ये हमास सरकारच्या प्रमुखासह ३ नेते ठार
Israel एअर स्ट्राईकमध्ये हमास सरकारच्या प्रमुखासह ३ नेते ठार

इस्त्रायल (Israel) संरक्षण दलाने (IDF) दि. २ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा दावा केला आहे. यामध्ये गाझा सरकारचा प्रमुख रावही मुश्ताहा यांचा ही समावेश आहे. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गाझामधील भूमिगत कंपाऊंडवर केलेल्या या हल्ल्यात रावही मुश्ताहा याच्यासह समेह सिराज(Sameh Siraj), समेह ओदेहे (Sameh Odehe) हे दोन हमास कमांडर ही ठार झाले आहेत. मात्र हमासने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

( हेही वाचा : Assembly Elections : महायुती, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष मोठ्या पक्षांना देत आहेत इशारे

रावही मुश्ताहा (Ravahi Mushtaha) हा गाझामधील हमास सरकारचा प्रमुख होता. तर समेह- अल सिराज हा हमासच्या राजकीय ब्युरो आणि कामगाराच्या समितीची सुरक्षा सांभाळत होता. त्यात मुश्ताहा हा हमासाचा सर्वेाच्च नेता याह्या सिनवार याचा जवळचा सहकारी होता. तसेच दि. ७ सप्टेंबर रोजीच्या इस्त्रायलवरील हल्ल्याचा ही तो मास्टरमाईंड होता.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.