गांधीहत्येमुळे सावरकर, ब्राह्मण समाज आणि हिंदुत्व बदनाम; Sharad Ponkshe यांनी व्यक्त केली खंत

147
गांधीहत्येमुळे सावरकर, ब्राह्मण समाज आणि हिंदुत्व बदनाम; Sharad Ponkshe यांनी व्यक्त केली खंत
गांधीहत्येमुळे सावरकर, ब्राह्मण समाज आणि हिंदुत्व बदनाम; Sharad Ponkshe यांनी व्यक्त केली खंत

नथुराम गोडसेने ३० जानेवारी, १९४८ ला गांधीची हत्या केली आणि त्यामुळे ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले असे प्रतिपादन शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केले. पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे अभिनेते शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. कर्वे रस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रुपये १० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

(हेही वाचा – Veer Savarkar गोरक्षणाच्या बाजूने होते, दिनेश गुंडूराव यांचे विधान पूर्णपणे खोटे – रणजित सावरकर)

पोंक्षे म्हणाले की, सन १९४६ पासून सावरकर सांगातात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकत वाढत होती. अशा परिस्थितीत आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता व ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला तो नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांनी. गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधीची हत्या केली. ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले. एका दैदिप्यमान अशा कारकीर्दीवर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. सावरकरांना गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. कोर्टात संपूर्णतः निर्दोष सुटून आजही कॉंग्रेसचे असे नेते जे स्वतः पुराव्याअभावी जामिनातीवर जेलबाहेर आहेत, ते नेते सावरकर गांधी हत्येत सहभागी होते परंतु पुराव्याअभावी सुटले असा कांगावा करत असतात.

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले, “स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा कॉंग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही मी माफी मागणार नाही, असे म्हणतो तेव्हा फार गंमत वाटते. आज स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी कॉंग्रेसला त्यांच्यावर चिखलफेक करण्याची इच्छा होते. यावरूनच आजही त्यांच्यावर असलेली सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.