Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ठरतात महापालिकेसाठी पांढरे हत्ती

853
Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ठरतात महापालिकेसाठी पांढरे हत्ती
Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ठरतात महापालिकेसाठी पांढरे हत्ती
  • सचिन धानजी,मुंबई

मागील काही वर्षांपासून मेट्रो रेल्वेच्या सुरु असलेल्या कामांमुळे आणि एमएमआरडीएकडून कायमच दुर्लक्षित झालेल्या अनुक्रमे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर मागील वर्षांपासून खड्डयांच्या शापातून पापमुक्त होत आहेत. मात्र, हे दोन्ही द्रुतगती महामार्ग आता महापालिकेसाठी पांढरे हत्ती ठरत आहेत. दोन्ही महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी, प्रवेश नियंत्रण प्रकल्प तसेच यावरील कर्ल्व्हटवरील साफसफाई आदींसाठी आतापर्यंत तब्बल १५०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ०३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटररुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद असा शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग (Express Highway) आहे. या दोन्ही मार्गांवरील पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी,खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच सेवा रस्ते,पदपथ यांची देखभाल, गटारांवरील झाकणे आदी कामांसाठी दोन्ही मार्गांसाठी एकाच ठेकेदाराची नियुक्ती केली.

(हेही वाचा – Veer Savarkar गोरक्षणाच्या बाजूने होते, दिनेश गुंडूराव यांचे विधान पूर्णपणे खोटे – रणजित सावरकर)

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Express Highway) पावसाळ्यापूर्वीची मुख्य रस्त्यावरील व सेवा रस्त्यांची मास्टिक द्वारे सुधारणा आदींसाठी २२१ कोटी रुपये तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्त्याची डागडुजी, मास्टिकद्वारे सुधारणा तसेच मायक्रो सरफेसिंग आदी कामांसाठी सुमारे २६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्प हाती घेण्यात आला असून यासाठी ११२५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या मार्गावरील कर्ल्व्हटची साफसफाई करण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे याशिवाय सुशोभीकरणाच्या कामांसाठीही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली नाका जंक्शन ते पी गोदरेज जंक्शन लगतच्या पदपथाचे सौदर्यीकरण करण्यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

त्यामुळे आजवर हे दोन्ही महामार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात असल्याने यावर महापालिका प्रशासनाला खर्च करता येत नव्हता. परंतु महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर प्रत्येक गोष्टींसाठी खर्च केला जात आहे. आतापर्यंत सेवा रस्ते हे मास्टिकने सुधारणा करण्यात येत असतानाच आता सेवा रस्ते सिमेंट काँक्रीटद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे १५०० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सेवा रस्ते हे सुस्थितीत असून मास्टिकद्वारे सुधारणा केल्यास त्याचा चांगला वापर होऊ शकतो असे असताना सिमेंट काँक्रिटचा वापर करून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. सेवा रस्त्यांचा वापर सिमेंट काँक्रिटद्वारे केल्यास युटीलिटीज टाकण्यासाठी वारंवार खोदकाम करावे लागत असल्याने यावरील खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Himanta Biswa Sarma : भारतात लपलेल्या बाबरांना धक्के मारून बाहेर काढा; हिमंत बिस्वा सरमांचे हिंदूंना आवाहन)

दरम्यान, महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर पुढील काळात योग्यप्रकारे देखभाल करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना सुचवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन आयआयटी मुंबईची मदत घेत आहे. त्यामुळे या दोन्ही द्रुतगती महामार्गाच्या (Express Highway) देखभालीवर आयआयटी मुंबईची नजर राहणार असून त्यांच्या पुढील अहवालानुसारच या दोन्ही मार्गाची देखभाल केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या द्रुतगती महामार्गाच्या सद्यस्थिती व इतर तांत्रिक बाबी तपासून कमीत कमी खर्चामध्ये मुंबईच्या वातावरणाशी व रहदारी अनुकूल तसेच वारंवार होणारे चरीकाम या सर्व बाबींचा अभ्यास करून देखभाल तथा सुधारणा करण्यासाठी योग्य ती पध्दत सुचवण्यासाठी आयआयटी मुंबईचे डॉ धर्मवीर सिंग यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही द्रुतगती महामार्गाची देखभाल तथा सुधारणा करण्यासाठी दिर्घकालिन उपाय बाबतचा अहवाल डॉ धर्मवीर सिंग हे महापालिकेला सादर केला आहे, त्यानुसार याची देखभाल करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्प
प्रकल्प खर्च : ११२५.८८ कोटी रुपये
कंत्राटदार : आर पी एस इन्फ्राप्रोजेक्ट
पूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी
एकूण खर्च : ९३ कोटी रुपये
कंपनी : के आर कंस्ट्रक्शन
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे व दुरुस्ती
एकूण खर्च : सुमारे ८५ कोटी रुपये
कंत्राट कंपनी : प्रीती कंस्ट्रक्शन कंपनी

(हेही वाचा – Janata NRC : घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव वाढवावा – रणजित सावरकर)

पूर्व द्रुतगती मार्गाची मास्टिकने सुधारणा

एकूण खर्च : सुमारे १८ कोटी रुपये

कंत्राट कंपनी : शहा आणि पारीख

पूर्व द्रुतगती मार्गाची मायक्रो सरफेसिंगने सुधारणा

एकूण खर्च : ४६.३१ कोटी रुपये

कंत्राट कंपनी : मारकोलाईन्स पेवमेंट टेक्नॉलॉजिस

पश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी

एकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपये

कंत्राट कंपनी : के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड – कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदार

पावसाळ्यापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे

एकूण खर्च : सुमारे ९० कोटी रुपये

कंत्राट कंपनी : कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छोटे नाले, कल्व्हर्टची सफाई

कंत्राट किंमत : ३ कोटी ७३ लाख रुपये

कंत्राटदार : राठोड भाग्यजीत अँड कंपनी

कंत्राट किंमत : २ कोटी ०५ लाख रुपये

कंत्राटदार : आर डी एंटरप्रायझेस

कंत्राट किंमत : १ कोटी ९८ लाख रुपये

कंत्राटदार : पी व्ही एंटरप्रायझेस

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.