केंद्र सरकारने दि. ३ ऑक्टोबर रोजी कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी साहित्यिकांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
(Marathi Abhijat Bhasha)
( हेही वाचा : Marathi Bhasha Abhijat Darja : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले निर्णयाचे स्वागत)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) प्रतिक्रिया देताना म्हणाले, हा आनंदाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी ३५ वर्षापासूनची आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, तेव्हापासूनची मागणी आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा ३५० सोहळा आपण साजरा केला. आता मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आनंद आणि अभिमान आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. (Marathi Abhijat Bhasha)
दरम्यान सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करू, असे सांगितले. तसेच या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची समिती तयार करून व्याकरण आणि शब्द भंडार वाढवण्याचा प्रयत्न करू, असे सूचक विधानही केले. (Marathi Abhijat Bhasha)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community