Marathi Bhasha Abhijat Darja : अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे निकष कोणते; काय आहेत लाभ ?

180
Marathi Bhasha Abhijat Darja : अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे निकष कोणते; काय आहेत लाभ ?
Marathi Bhasha Abhijat Darja : अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे निकष कोणते; काय आहेत लाभ ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक दशकांपासून प्रलंबित होती. मराठीसह पाच क्षेत्रीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यात पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या भाषांचा समावेश आहे. केंद्र सरकारने यापूर्वी तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांची एकूण संख्या 11 वर पोहोचली आहे. (Marathi Bhasha Abhijat Darja)

(हेही वाचा – Isha Foundationच्या आश्रमावर धाड टाकली, तशी धाड चर्च आणि मदरसे यांवर कधी टाकणार ?; हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न)

अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला मिळतो ?
  • भारत सरकारच्या भाषा तज्ज्ञ समितीकडून कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि कोणत्या भाषेला नाही याचा निर्णय घेतला जातो.
  • जवळपास 1500 ते 2000 हजार वर्षे जुनी भाषा असेल तर आणि त्या भाषेतील जुने ग्रंथ उपलब्ध असतील, तर त्या भाषेला अभिजात दर्जा दिला जातो.
  • प्राचीन साहित्य, ज्ञान ग्रंथ, गद्य ग्रंथ, कविता, अग्रलेख आणि शिलालेख पुरावा उपलब्ध असायला हवा.भाषा समिती या सर्व गोष्टींचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस करीत असते.
    अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे काय आहेत लाभ ?
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या प्रचाराचे अनेक मार्ग खुले झाले आहेत.
  • आजच्या निर्णयानंतर विविध विद्यापिठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करता येईल.
  • मराठीच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार दिला जाऊ शकतो.
    कोणत्या भाषांना यापूर्वी मिळाला आहे अभिजात भाषेचा दर्जा 

    संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी 2020 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार तीन केंद्रीय विद्यापिठांची स्थापना करण्यात आली होती. तामिळ भाषेतील जुन्या ग्रंथांचे भाषांतर अन्य भाषांमध्ये करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळची स्थापना आधीच करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून तमिळ भाषेत संशोधन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. म्हैसूर येथे सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस स्थापन करण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातून कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया भाषेतून संशोधन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. अभिजात भाषांतून संशोधन आणि अन्य अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तराचे पुरस्कारही सुरू करण्यात आले आहेत. (Marathi Bhasha Abhijat Darja)

    हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.