चर्चगेट येथील इरॉस थिएटर जवळून आईच्या कुशीतुन चोरीला गेलेल्या १ वर्षाच्या मुलीची राजस्थान मधुन सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली आहे, या महिलेने भीक मागण्यासाठी मुलीची चोरी केली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Crime News)
चर्चगेट येथील इरॉस थिएटर जवळील फुटपाथवरून ११ सप्टेंबर रोजी आईच्या कुशीत झोपलेल्या १ वर्षाच्या मुलीला एका अनोळखी महिलेने चोरी करून पोबारा केला होता.याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मरीन ड्राईव्ह पोलिसांनी परिसरातील तसेच रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एक महिला मुलीला घेऊन जात असताना मरीन लाईन्स रेल्वे स्थानाकातील फुटेज मध्ये आढळून आली. (Crime News)
पोलिसांनी या महिलेचा माग काढत,राजस्थान गाठले परंतु तीचा थांगपत्ता लागत नव्हता, या आरोपी महिलेच्या शोधात गुन्हे शाखा कक्ष १ चे पथक देखील राजस्थान मध्ये महिनाभर ठाण मांडून बसले होते. गुन्हे शाखेने राजस्थान,जयपूर, अजमेर परिसरात आपले खबरी तयार करून या महिलेचे फोटो खबर्याना दिले होते. (Crime News)
दरम्यान जयपूर येथे फोटो मधील महिला लहान मुलीला घेऊन भीक मागत असल्याचे खबऱ्याने बघितले आणि त्यांनी गुन्हे शाखेला कळवले. गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ जयपूर येथे धाव घेऊन या महिलेला मुलीसह ताब्यात घेऊन मुलीची ओळख पटवली असता मरीन ड्राईव्ह येथून चोरीला गेलेले मुलगी असल्याची खात्री होताच पोलिसांनी महिलेला मुलीसह ताब्यात घेऊन त्यांना ट्रँझिस्ट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत आहे. (Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community