Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट; म्हणाले…

219
Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट; म्हणाले...
Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट; म्हणाले...

मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळावा ही गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मिडीया पोस्ट केली आहे.

(हेही वाचा-Sanjay Rathod Accident: मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात; चालक गंभीर)

सोशल मिडीया पोस्टद्वारे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते.”

“त्या सभेत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’ ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार.” असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.