Irani Cup 2024 : अभिमन्यू ईश्वरनच्या शतकामुळे शेष भारताचं मुंबईला चोख उत्तर 

Irani Cup 2024 : शेष भारताचा संघ अजूनही २४८ धावांनी पिछाडीवर आहे 

69
Irani Cup 2024 : अभिमन्यू ईश्वरनच्या शतकामुळे शेष भारताचं मुंबईला चोख उत्तर 
Irani Cup 2024 : अभिमन्यू ईश्वरनच्या शतकामुळे शेष भारताचं मुंबईला चोख उत्तर 
  • ऋजुता लुकतुके 

मुंबई विरुद्ध शेष भारत संघा दरम्यान सुरू असलेल्या इराणी चषक अंतिम सामन्यात अभिमन्यू ईश्वरनच्या (Abhimanyu Easwaran) शतकामुळे शेष भारताने रणजी विजेत्या मुंबईला चोख उत्तर दिलं आहे. तिसऱ्या दिवस अखेर शेष भारताने फक्त ४ फलंदाज गमावून २८९ धावा केल्या आहेत. पण, संध अजूनही २४८ धावांनी पिछाडीवर आहे. चषक जिंकण्यासाठी किमान पहिल्या डावातील आघाडी आवश्यक असते. ते पाहता अजूनही सामन्यात मुंबईचं पारडं जड आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबईचा अख्खा संघ ५३७ धावांत सर्वबाद झाला. सर्फराझ २२१ धावांवर नाबाद राहिला.  (Irani Cup 2024)

(हेही वाचा- Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ठरतात महापालिकेसाठी पांढरे हत्ती)

त्यानंतर शेष भारत संघानेही दमदार कामगिरी केली. दिवसभरात फक्त ५ बळी गेले. यातील ४ शेष भारत संघाचे होते. अभिमन्यू ईश्वरनने (Abhimanyu Easwaran) सुरुवातीपासून किल्ला लढवत ७१ धावांच्या स्ट्राईकरेटने नाबाद १५१ धावा केल्या आहेत. त्याच्या वेगवान फलंदाजीमुळेच शेष भारत संघ दिवसभरात २८९ धावा करू शकला. अभिमन्यूने १ षटकार आणि १२ चौकार ठोकले. (Irani Cup 2024)

 अभिमन्यू ईश्वरनने (Abhimanyu Easwaran) या खेळीबरोबरच निवड समितीसमोरही आपली दावेदारी सिद्ध केली आहे. भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. यशस्वी रणजी हंगामानंतर अभिमन्यू आता इराणी चषकातही धावा करत आहे. साई सुदर्शन (Sai Sudharsan), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्याबरोबर त्याने स्थिर भागिदारी रचल्या. शेष भारत संघाला एकाच दिवसांत २८९ धावांचा पल्ला गाठून दिला. विशेष म्हणजे अभिमन्यूचं हे हंगामातली चौथं शतक आहे. (Irani Cup 2024)

(हेही वाचा- Mumbai Crime News : रुग्णांना बरे करण्याची १०० टक्के गॅरंटी देणाऱ्या चार भामट्यांना पकडले)

दिवसअखेर ध्रुव जुरेलबरोबरही अभिमन्यूने अर्धशतकी भागिदारी रचली आहे. इऱाणी चषकाचा अंतिम सामना चुरशीचा होताना दिसत आहे. सध्या शेष भारत संघ मुंबईपेक्षा २४८ धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात स्पष्ट निकाल लागला नाही तर पहिल्या डावातील आघाडीवर इराणी चषक जिंकता येतो. (Irani Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.