Sharad Pawar : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शरद पवार काय म्हणाले?

298
Sharad Pawar : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शरद पवार काय म्हणाले?

मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळावा ही गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा-Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट; म्हणाले…)

माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी साहित्याच्या क्षेत्रातील सर्वांनी केली. साहित्य परिषदेमध्ये,अधिवेशनामध्ये ठराव करून तेथेही करण्यात आली होती. माझ्यासारखे अनेक सहकारी , ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आस्था आहे. आम्हीसुद्धा व्यक्तीगत पातळीवर केंद्र सरकारकडे मागणी करत यासंदर्भात आग्रह केला, पाठपुराव केला होता. केंद्र सरकारने मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाषेचं महत्व वाढण्यासाठी या निर्णयाचा अतिशय उपयोग होणार आहे.”

(हेही वाचा-Marathi Bhasha Abhijat Darja : अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे निकष कोणते; काय आहेत लाभ ?)

“यापूर्वी मराठी भाषेत जे काही लिखाण झालं आहे, पण जे फारसं लोकांच्या नजरेसमोर आलेलं नाही, ते लोकांसमोर आणण्यासाठीचा मार्ग यामुळे खुला झाला. याशिवाय, नवीन पिढी काही लिहू पहात असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंबंधीची तरतूद त्यामध्ये आहे, त्याचाही लोकांना लाभ होईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा हा जो निर्णय आहे, त्याला खरंतर उशीर झाला पण तरीही तो निर्णय झाला याचा आनंद आहे, त्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो.” असे शरद पवार म्हणाले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.