३ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्राकृत, पाली, मराठी, बंगाली, आसामी या भाषेनाही अभिजात भाषेचा (Marathi Bhasha Abhijat Darja) दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनात ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया मराठी साहित्यिकांकडून दिली जात आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. (Marathi Abhijat Bhasha)
(हेही वाचा – HR Manager : ऑफिसमध्ये नोकरीच्या मुलाखती घेण्याबरोबरच एचआर अधिकाऱ्याला ‘ही’ कामंही असतात)
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की,
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात…
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2024
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
या निर्णयानंतर महाराष्ट्रातून आनंद व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही याविषयी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community