सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांनी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. (Marathi Bhasha Abhijat Darja)
(हेही वाचा – PM Modi यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या वाहतुकीत मोठे बदल! वाचा सविस्तर…)
संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरु संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठी भाषेचा अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे सन्मान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुखावणारा आहे.
माय मराठीला बहुप्रतिक्षित अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. पाली आणि प्राकृत, बंगाली आणि आसामी यांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मला आनंद आहे. मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर, अधिकाधिक लोक, विशेषत: युवक आणि लहान मुले मराठी भाषा शिकतील, बोलतील व या भाषेत लिहतील तसेच मराठी भाषा विश्वभाषा करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.
या आनंदाच्या प्रसंगी मी राज्यातील जनतेचे आणि जगभरातील मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने मी पुनश्च केंद्रीय मंत्रिमंडळाचे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. (Marathi Bhasha Abhijat Darja)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community