मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे, त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला, तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, असे म्हणत इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवार गटातील प्रवेशाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
४ आक्टोबर रोजी इंदापूर (Indapur) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गेले काही दिवस हर्षवर्धन पाटील वेगळा निर्णय घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. ३ ऑक्टोबर रोजीच त्यांच्या मुलांच्या व्हॉट्स अप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मशाल चिन्ह ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची कल्पना आली होती.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, जनतेचा आवाज एकच आहे मी निवडणूक लढवली पाहिजे. मी शरद पवारांना भेटलो, त्यांनीही मला सांगितले की, तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारले, तुम्ही काय निर्णय काय निर्णय घेणार ? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की, जनतेचा आग्रह आहे, तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन.
असे म्हणून हर्षवर्धन (Harshvardhan Patil) यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community