Ratnagiri Crime : लाईफ एन्जॉय कर, २ दिवसांत तुझा मृत्यू! शॉपिंग मॉलमधील दुकानांसमोर चिठ्ठ्या; परिसरात दहशत

156
Ratnagiri Crime : लाईफ एन्जॉय कर, २ दिवसांत तुझा मृत्यू! शॉपिंग मॉलमधील दुकानांसमोर चिठ्ठ्या; परिसरात दहशत
Ratnagiri Crime : लाईफ एन्जॉय कर, २ दिवसांत तुझा मृत्यू! शॉपिंग मॉलमधील दुकानांसमोर चिठ्ठ्या; परिसरात दहशत

रत्नागिरीच्या खेडमधुन एक धक्कादायक (Ratnagiri Crime) प्रकार समोर येत आहे. दोन दिवस राहिलेत, आयुष्य जगून घे. दोन दिवसांनी तुझा मृत्यू होणार, अशा आशयाच्या चिठ्ठ्या खेडमधील अनिकेत शॉपिंग मॉलमधील दुकानांसमोर सापडल्या आहेत. मॉलमधील २५ ते ३० दुकानांसमोर चिठ्ठ्या आढळून आल्यानं परिसरात भितीचे वातावरण आहे. या चिठ्ठीत लाल रंगाच्या शाईनं मजकूर लिहिण्यात आलेला आहे.

(हेही वाचा-“दिनेश गुंडूराव यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात…”, Naresh Mhaske यांचा इशारा)

‘२ दिवसांत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी तुझा मृत्यू होईल. आयुष्य जगून घे,’ असा मजकूर चिठ्ठीत आहे. खाली ब्लडी मॅरी असं लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे दुकानदारांसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. धमक्यांच्या चिठ्ठ्या कोणी ठेवल्या? या सगळ्यामागे नेमकं कोण आहे? असे प्रश्न दुकानदारांना पडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक दुकानासमोर असलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलेल्या तारखा वेगवेगळ्या आहेत. (Ratnagiri Crime)

(हेही वाचा-PM Modi यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या वाहतुकीत मोठे बदल! वाचा सविस्तर…)

सकाळच्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. धमकीच्या चिठ्ठ्यांची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी सुरु आहे. चिठ्ठ्या ठेवणारा/ठेवणारे त्यात कैद झाले आहेत का याचा शोध घेतला जात आहे. (Ratnagiri Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.