PM Narendra Modi शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; ‘या’ महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे करणार उद्घाटन

महाराष्ट्र दौऱ्यात सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ

167
PM Narendra Modi शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे करणार उद्घाटन
  • प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहतील.

(हेही वाचा – Edible Oil : भारताचा खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेचा नारा, १०१ अब्ज रुपयांचा प्रकल्प उभारणार)

पंतप्रधानांचे वाशिम मधील कार्यक्रम

वाशिममध्ये पंतप्रधान (PM Narendra Modi) 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, 9,200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील.

तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

(हेही वाचा – Mantralaya : आदिवासी आमदार आक्रमक! मंत्रायालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारत केलं आंदोलन; नेमकं कारण काय ?)

ठाण्यातील नागरी गतिशीलता वाढवण्यासाठी 32,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

दुपारी 4 वाजता, पंतप्रधान (PM Narendra Modi) ठाणे येथे सुमारे 32,800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

याशिवाय, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे.

(हेही वाचा – Maratha : मराठा संघटनांनी माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांवर केलेल्या आरोपांवर दिले आव्हान, म्हणाल्या, पुरावे द्या…)

नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्राच्या विकासासाठी NAINA प्रकल्पाची पायाभरणी

ठाण्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्प, ज्याची फेज-1 पायाभरणी होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पायाभूत सुविधा विकासाला गती मिळणार आहे.

या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्राच्या कृषी, नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.