केंद्रीय परराष्ट्रमंत्री S Jayshankar जाणार पाकिस्तानात  

88

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) पाकिस्तानमध्ये आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानने पाठवले निमंत्रण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) चे अध्यक्षपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यानुसार, पाकिस्तानने 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी SCO शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.

(हेही वाचा तिरुपती प्रकरणी प्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापणार- Supreme Court)

सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले

दरम्यान, पाकिस्तान सरकारने ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीचे निमंत्रण पाठवले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, 15-16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याअंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काही देशांनी या बैठकीत सहभागी होण्याची पुष्टी केली आहे, त्याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या शिखर परिषदेपूर्वी, एक मंत्रीस्तरीय बैठक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अनेक फेऱ्या होतील, ज्यामध्ये SCO सदस्य देशांमधील आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि मानवतावादी सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, SCO मध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.