- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मालाड (पश्चिम) येथील मिठ चौकी, (Malad Mith Chowky Junction) जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका येत्या रविवारी ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मिठ चौकी जंक्शनवर नागरिकांना वाहतूक कोंडी समस्येला सामोरे जावे लागत होते. यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने ‘टी’ आकाराचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, आमदार अस्लम शेख, आमदार योगेश सागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त (पी उत्तर) किरण दिघावकर आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मिठ चौकी जंक्शनवर (Malad Mith Chowky Junction) नागरिकांना वाहतूक कोंडी समस्येला सामोरे जावे लागत होते. यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘टी’ आकाराचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. ११ एप्रिल २०२२ रोजी उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी मार्गिका आणि मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी मार्गिका अशी उड्डाणपुलाची रचना आहे. त्यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका वाहतुकीसाठी रविवार, दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ पासून खुली करण्यात येणार आहे. या मार्गिकेची लांबी ३९० मीटर असून रूंदी ८ मीटर आहे.
डिसेंबर २०२४ पर्यंत मार्वेकउन गोरेगावकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिका होणाऱ्या खुल्या
दहिसर ते अंधेरी (पश्चिम) मेट्रो-२ च्या उन्नत मार्गामुळे महानगरपालिकेने बांधलेल्या उड्डाणपुलाच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी हलक्या वाहनांसाठीच या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा वापर केला जाणार आहे. तर, मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी उड्डाणपुलाची मार्गिका डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत खुली करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने, दुसऱ्या मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने पूर्णत्वाकडे नेण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ५५ कोटी रूपये अंदाजित खर्च आहे. उड्डाणपुलाची एक मार्गिका (मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्ग) खुली केल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोडीतून सुटका होईल. परिणामी, वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
(हेही वाचा – Cabinet Decision : तीन ऑक्टोबर ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करणार)
मालवणी टाऊनशिप शालेय इमारतीचे लोकार्पण
मालाड (पश्चिम) परिसरात मालवणी-मार्वे मार्ग स्थित मालवणी टाउनशिप महानगरपालिका शालेय इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवारी ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. मालवणी टाऊनशिप महानगरपालिका शाळेची स्थापना सन १९६६ मध्ये झाली. पूर्वी या इमारतीचे स्वरूप तळमजला अधिक एक मजला असे होते. ही शालेय इमारत सन २०२० मध्ये पाडण्यात आली होती. त्यानंतर तळमजला आणि सहा मजले अशा स्वरुपात या शालेय इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. एकूण वर्ग खोल्या १०४ आहेत. प्रत्येक शालेय मुख्याध्यापक कार्यालय, शिक्षक खोली, एम. डी. एम. खोली, विशेष गोदाम खोली, ग्रंथालय, संगणक कक्ष, पाण्याची खोली इत्यादी सुविधा आहेत. तसेच, ०२ सभागृहदेखील आहेत. या इमारतींसाठी एकूण ५६ कोटी ७२ लाख रूपयांचा खर्च आला आहे.
मालवणी टाउनशिप या शिक्षण संकुलातील एकूण विद्यार्थी संख्या २ हजार ८२७ इतकी आहे. त्यात प्राथमिक मराठी (पहिली ते आठवी) शाळेत १९९ विद्यार्थी, बालवाडीत २९ विद्यार्थी, हिंदी माध्यमाच्या मालवणी टाउनशिप हिंदी क्रमांक ०१ शाळेत ५९५ विद्यार्थी, हिंदी क्रमांक ०२ शाळेत ३८३ विद्यार्थी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेची विद्यार्थी संख्या १ हजार १९५, बालवाडीची विद्यार्थी संख्या १२६ इतकी आहे. केंद्रीय माध्यमिक शालांत मंडळाच्या (सीबीएससी) पहिली ते सहावी इयत्तेत ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. (Malad Mith Chowky Junction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community