PM Narendra Modi करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्धाटन, अशी आहे मेट्रो- ३

सुमारे १४, १२० कोटी रुपयांचा मुंबई मेट्रो-३ प्रकल्प

72
PM Narendra Modi आज करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्धाटन, अशी आहे मेट्रो- ३
PM Narendra Modi आज करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्धाटन, अशी आहे मेट्रो- ३

मुंबईतील वाढती लोकसख्या आणि कमी पडत असलेली जागा यामुळे वाहतुकीचे पर्यायही तोकडे पडत आहेत. त्यामुळे मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे -३ (Metro 3) मार्गिकेच्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी टप्प्याचे दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) वाशिममध्ये सुमारे २३०० कोटी रुपये खर्चाच्या कृषी – पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित आणि ठाण्यातील ३२,८०० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

अशी आहे मेट्रो-३

ठाण्यात नागरी गतिशीलता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा भाग म्हणून, पंतप्रधान प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी दि. ५ ऑक्टोबर रोजी करणार आहेत. सुमारे १४, १२० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो-३ (Metro 3) च्या जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात १० स्थानके असून त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो-३ (Metro 3) हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. तसेच मेट्रो-३ (Metro 3) पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे १२ लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.

( हेही वाचा :  Solapur to Mumbai Air Route साठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार

सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi ) हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी असून त्यात २० उन्नत आणि २ भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. सुमारे ३,३१० कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान (PM Narendra Modi) करणार आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.

याशिवाय, पंतप्रधान सुमारे २,५५० कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाच्या फेज-१ ची पायाभरणी करतील. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे. सुमारे ७०० कोटी रुपये खकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालये सामावून घेऊर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.