Irani Cup 2024 : मुंबईकडे २७४ धावांची आघाडी, पाचव्या दिवशी विजयाची चांगली संधी 

Irani Cup 2024 : आता पाचव्या दिवशी मुंबईला आपल्याकडील आघाडी वाढवावी लागेल 

133
Irani Cup 2024 : मुंबईकडे २७४ धावांची आघाडी, पाचव्या दिवशी विजयाची चांगली संधी 
Irani Cup 2024 : मुंबईकडे २७४ धावांची आघाडी, पाचव्या दिवशी विजयाची चांगली संधी 
  • ऋजुता लुकतुके 

इराणी चषकाच्या अंतिम फेरीत मुंबई आणि शेष भारत दरम्यानची लढत पाचव्या दिवशी रंगतदार अवस्थेत आहे. मुंबईकडे २७४ धावांची आघाडी आणि चार गडी शिल्लक आहेत. तर शेष भारतालाही मुंबईला झटपट गुंडाळून ३०० च्या जवळपास धावा चार तासांत केल्या तर विजयाची अंधुक संधी आहे. चौथ्या दिवसाचं वैशिष्ट्य अभिमन्यू ईश्वरनच्या १९१ धावा आणि जुरेलने ९३ धावा करत त्याला दिलेली साथ हे ठरलं. अभिमन्यू ईश्वरनची द्विशतकाची संधी मात्र हुकली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १६५ धावांची भागिदारी रचली. दोघं मैदानात होते तोपर्यंत शेष भारताला सामन्यात चांगली संधी होती. पण, दोघंही लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाले. (Irani Cup 2024)

(हेही वाचा- Ratnagiri: तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रातील दोन मोठे प्रकल्प कोकणात; रत्नागिरीत होणार २९५५० कोटींची गुंतवणुक)

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) दोघांभोवती फिरकीचं जाळं विणलं. दोघंही स्विपचे चुकीचे फटके खेळून बाद झाले. दोघं ३९३ धावांवर बाद झाले. त्यानंतर उर्वरित शेष भारत संघ आणखी फक्त २० धावांची भर घालून ४१६ धावांत सर्वबाद झाला. खरंतर इथेच सामना मुंबईच्या हातात आला. कारण, सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातील आघाडीवरही मुंबई इराणी चषक जिंकू शकतो. (Irani Cup 2024)

 मुंबईसाठी शम्स मुलानी आणि तनुश कोटियन यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. त्यानंतर मुंबईचा दुसरा डाव सुरू होईपर्यंत खेळपट्टीला तडे गेलेले होते. अशा खेळपट्टीवर चेंडूही वळायला लागले होते. त्यामुळेच शेष भारताचे फिरकीपटू सारांश जैन आणि मानव सुतार यांनी मुंबईची मधली फळी कापून काढली. पृथ्वी शॉचं अर्धशतक सोडलं तर आयुष म्हात्रे (१४), हार्दिक तमोरे (७), अजिंक्य रहाणे (९), श्रेयस अय्यर (८) आणि शम्स मुलानी शून्यावर बाद झाले. सारांशने ६७ धावांत ४ बळी मिळवले. (Irani Cup 2024)

(हेही वाचा- PM Narendra Modi करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्धाटन, अशी आहे मेट्रो- ३)

दिवसअखेर सर्फराझ खान (Sarfaraz Khan) ९ धावांवर तर तनुष कोटियन २० धावांवर खेळत आहेत. त्यामुळे पाचव्या दिवशी मुंबईला विजयाची चांगली संधी असली तरी शेष भारतालाही प्रयत्न करण्याची संधी आहे. मुंबईने २००० नंतर एकदाही इराणी चषक जिंकलेला नाही. (Irani Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.