गोरबंजारा साहित्य अकादमीवर (Gor Banjara Sahitya Kala Akademi ) ११ अशासकीय सदस्यांची नियुक्ती दि. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा म्युझियमचा लोकापर्ण सोहळा ही दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते होणार आहे. याआधी राज्य सरकारकडून गोरबंजारा साहित्य अकादमीवर सदस्याच्या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा : Non-Agricultural Tax: राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ)
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११.१५ वाजता पोहरादेवी (Poharadevi) येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेणार आहेत. तसेच सकाळी ११.३० च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यात गोरबंजारा साहित्य अकादमी ११ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याने गोरबंजारा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community