Swiggy Bolt : आता स्विगीवर मिळणार १० मिनिटात घरपोच सेवा

Swiggy Bolt : सुरुवातीला फक्त ६ महानगरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. 

57
Swiggy Bolt : आता स्विगीवर मिळणार १० मिनिटात घरपोच सेवा
  • ऋजुता लुकतुके

स्विगी ही हॉटेलमधून अन्नपदार्थ घरपोच पुरवणारी सेवा आहे. कंपनीचा आता आयपीओ येऊ घातला आहे. अन्नपदार्थ पोहोचवण्याबरोबरच कंपनी किराणा मालही घरपोच देते. आता कंपनीने १० मिनिटांत अन्नपदार्थ देऊ करणारी स्विगी बोल्ट (Swiggy Bolt) ही सेवा सुरू केली आहे. सुरुवातीला बंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्येच ही सेवा सुरू झाली आहे. ‘डिलिव्हरीचा वेग, चव आणि सोय यामुळे जगातील सगळे अन्नपदार्थांचे ब्रँड तयार झाले.

आता स्विगी फूडही या तत्त्वावर चालणार आहे. चांगलं आणि शुद्ध अन्न ग्राहकांना १० मिनिटांत घरपोच मिळणार आहे. सुरुवातीला सहा महानगरांमध्ये स्विगी ही सेवा सुरू करत आहे,’ असं स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी लिंक्डइनवर सांगितलं. सुरुवातीला या सेवेची चाचपणी करण्याचा कंपनीचा इरादा आहे. हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहकांची प्रतिसाद पाहून मग सेवेचा विस्तार करण्यात येईल. सध्या शहरांच्याही काही भागांमध्येच ही सेवा उपलब्ध असेल. (Swiggy Bolt)

(हेही वाचा – Virendra Sehwag : विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचं दिल्लीसाठी पदार्पण)

यावर्षी एप्रिल महिन्यात स्विगीने शेअर बाजारात आयपीओसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कंपनीने रणनीतीत थोडा बदल करताना ३,७५० कोटींचे नवीन शेअर आयपीओ मार्गाने आणि १८.५२ कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल शेअरही देण्याचं ठरवलं आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबरला कंपनीने आपल्या आयपीओचा आकार वाढवून तो ३,७५० कोटी रुपयांऐवजी ५,००० कोटी रुपये इतका केला आहे. (Swiggy Bolt)

बंगळुरू स्थित या कंपनीचा आयपीओ हा अलीकडचा भारतातील एक मोठा आयपीओ असणार आहे. सध्या स्विगीमध्ये प्रोसस कंपनीची ३२ टक्के भागिदारी आहे. तर सॉफ्टबँकेची ८ टक्के आणि ॲक्लेलची ६ टक्के भागिदारी आहे. झोमॅटोनंतर आयपीओ द्वारे शेअर बाजारात येणारी स्विगी ही दुसरी अन्नपदार्थ तसंच किराणा माल घरपोच पोहोचवणारी कंपनी असेल. (Swiggy Bolt)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.