Indian Forex Reserves : भारताची परकीय गंगाजळी विक्रमी ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरवर

Indian Forex Reserves : एका महिन्यात १२.५८ अब्ज डॉलरची भर भारतीय तिजोरीत पडली आहे.

48
Indian Forex Reserves : भारताची परकीय गंगाजळी विक्रमी ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरवर
  • ऋजुता लुकतुके

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या परकीय गंगाजळीत १२.५८ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली. आणि त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा विक्रमी ७०४.७७५ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. या आधीच्या आठवड्यात फक्त २ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली होती. पहिल्यांदाच भारताची परकीय गंगाजळी ७०० अब्जांच्या वर गेली आहे. परकीय गंगाजळीचा मोठा हिस्सा असतो तो परकीय चलन साठा. गेल्या आठवड्यात हा साठा १०.४६ अब्ज अमेरिकन डॉलरवर गेला आहे. (Indian Forex Reserves)

(हेही वाचा – “तुम्ही संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून…”, झिरवळांनी केलेल्या कृतीवर Raj Thackeray यांचा टीका)

युरो, अमेरिकन डॉलर, पाऊंड आणि येन अशा चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी कशी आहे यावर परकीय चलन साठ्याचे मूल्य व मालमत्ता अवलंबून आहे. गेल्या आठवड्यात यात चांगलीच सुधारणा झालेली दिसून आली आहे. भारताकडे असलेला सुवर्ण साठाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेली भारताची मालमत्ता मात्र ७१ दशलक्ष अमेरिकन डॉलरनी कमी झाली आहे.

परकीय चलनाच्या बाबतीत आता भारत हा रशियाबरोबर चौथ्या स्थानावर आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यानंतर परकीय साठा भारताला उपयोगी पडणार आहे. (Indian Forex Reserves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.