Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

62
Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

विधानसभा निवडणूक २०२४ (Assembly Election) च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी मुंबई पोलीस दलातील १११ पोलीस निरीक्षकाच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईतून एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमुळे मुंबई पोलिस दलावर ऐन सणासुदीत आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठा ताण येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

(हेही वाचा – Swiggy Bolt : आता स्विगीवर मिळणार १० मिनिटात घरपोच सेवा)

मुंबईची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या मुंबई पोलिस दलाला ऐन निवडणुकीच्या (Assembly Election) काळात मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून शुक्रवारी मुंबई पोलीस दलातील १११ पोलीस निरीक्षकाच्या मुंबई जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्यामुळे मुंबई पोलीस दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबई बाहेरून मुंबईत बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांमुळे ही पोकळी भरून काढण्यात येत असली तरी मुंबईतील गुन्हेगारी पार्श्वभूमी, राजकीय हालचाली, मुंबईची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था समजून घेण्यास वेळ लागणार आहे.

(हेही वाचा – “तुम्ही संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून…”, झिरवळांनी केलेल्या कृतीवर Raj Thackeray यांचा टीका)

मुंबई पोलीस आयुक्तांनी काही आठवड्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे मुंबईतील पोलीस निरीक्षकाच्या बदल्या संदर्भात पत्रव्यवहार करून बदल्याना स्थगिती देण्यात यावी ही विनंती करण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली नसून बदल्यांचे निर्देश कायम ठेवण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मुंबई पोलीस दलातील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर झालेल्या बदल्यामुळे मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत, लवकरच या ठिकाणी नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची जागा भरण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.