केरळच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या अली हुसैनने (Ali Hussain) ५ वर्षाच्या एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexual Assault) केला आहे. लहान मुलीला चिप्स देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला आणि मुलीवर हुसैनने अत्याचार (Sexual Assault) केला. पोलिसांनी अली हुसैनला अटक करून चौकशी सुरु केली आहे.
( हेही वाचा : “तुम्ही संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून…”, झिरवळांनी केलेल्या कृतीवर Raj Thackeray यांचा टीका)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मलप्पुरमच्या नीलाम्बुरमध्ये दि.३ ऑक्टोबर रोजी रात्री एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार (Sexual Assault) करण्यात आला. मुलगी आपल्या आई-वडीलांसोबत राहत असून ते फिरतीवर काम करत असतात. मुलीचे दि. ३ ऑक्टोबर रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर ५३ वर्षीय अली हुसैनने अत्याचार (Sexual Assault) केले. त्यानंतर पीडितेने यासंदर्भात आपल्या आई-वडीलांना माहिती दिली. कुटुंबियांनी पीडितेला रुग्णालयात नेले. पोलिसांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. तसेच अली हुसैनने पीडितेला पळवून नेण्याचा ही प्रयत्न केला. दरम्यान आरोपीला स्थानिक गोदामातून अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community