Assembly Election 2024 : भाजपाशी थोरल्या भावासारखे भांडणारे ठाकरे काँग्रेस समोर मुकाट झाले धाकटे भाऊ

90
Assembly Election 2024 : भाजपाशी थोरल्या भावासारखे भांडणारे ठाकरे काँग्रेस समोर मुकाट झाले धाकटे भाऊ
भाजपाची (BJP) थोरल्या भावासारखे भांडणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काँग्रेस समोर मोकाट धाकटा भाऊ झाले असल्याचे काहीस चित्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपांबद्दल दिसून येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस (Congress) सर्वात जास्त जागा लढणार असून त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांची उबाठा तर त्यापेक्षा काहीशा कमी जागांवरती शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. (Assembly Election 2024)
२०१४ मध्ये उद्धव ठाकरे भाजपाशी थोरला भाऊ – धाकटा भाऊ या मुद्द्यावरूनच भांडत होते. १५१ पेक्षा कमी जागा उद्धव ठाकरेंना मान्य नव्हत्या. त्यामुळे भाजपाशी त्यांची युती तुटली. भाजपा (BJP) आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत १२२ जागा जिंकून भाजपा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सगळ्यात थोरला भाऊ झाला. शिवसेनेला ६३ जागा मिळाल्याने तो आपोआपच धाकटा भाऊ ठरला होता. आता तर महाविकास आघाडीत काँग्रेसची “दादागिरी” सुरू झाली आहे. ठाकरे आणि पवार आपोआपच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे भाऊ बनले आहेत. (Assembly Election 2024)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) स्ट्राईक रेट सर्वाधिक चांगला राहिला. काँग्रेस पक्ष १७ पैकी १४ जागा जिंकून पहिल्या नंबर वर राहिला. पवारांचा पक्ष १० पैकी ८ जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिला. उद्धव ठाकरेंची उबाठा ९ जागा जिंकून दुसऱ्या नंबर वर राहिली असली, तरी त्यांचा स्ट्राईक रेट मात्र सगळ्यात कमी राहिला. कारण ठाकरेंच्या शिवसेनेने २१ पैकी ९ जागा जिंकल्या. (Assembly Election 2024)
यामुळेच विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात काँग्रेसने स्ट्राईक रेटचा आधार सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला. तोच आधार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मान्य करायला लावला. त्या आधारे केलेल्या जागा वाटपात काँग्रेसला १०५ ते ११०, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९५ ते १०० आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला ८५ जागा आल्या. याचा अर्थ भाजपाशी थोरल्या भावाच्या थाटात भांडणारे उद्धव ठाकरे काँग्रेस समोर नांगी टाकून मुकाटपणे धाकटे भाऊ झाले. पण शरद पवारांचा स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला राहून देखील पवार मात्र उद्धव ठाकरेंना मागे रेटू नाही शकले. हेच जागावाटपाच्या निष्कर्षातून समोर आले. (Assembly Election 2024)
जागा वाटपाचं हे सूत्र उद्धव ठाकरे यांच्या उबाठाला मान्यच करावे लागत आहे कारण त्याशिवाय त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारचा दुसरा पर्याय नाही. सध्या उद्धव ठाकरे यांच्या उबाठाची अवस्था काहीशी सहनही करता येत नाही आणि सांगता येत नाही अशी झाली आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.