पोहरागडावर येणारे PM Narendra Modi पहिले!

74
पोहरागडावर येणारे PM Narendra Modi पहिले!
पोहरागडावर येणारे PM Narendra Modi पहिले!

Jपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी (5 ऑक्टोबर) राज्याच्या दौऱ्यावर असून विदर्भातील वाशिम (vashim) येथून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवी (Pohradevi) मंदिराज जाऊन पूजा केली. यावेळी मंदिरात त्यांनी पारंपरिक नगारा वाजवून जगदंबेचा आशीर्वाद घेतला.

(हेही वाचा-Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा)

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील देवीची विशेष पूजा आणि आरतीमध्ये ढोल नगारा वाजवण्याची परंपरा आहे. मंदिरात लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की नगारा वाजवून कृतज्ञता व्यक्त केली जाते. मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी नगारा वाजवून जगदंबेचे आशीर्वाद घेतले. यासोबतच त्यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. (PM Narendra Modi)

(हेही वाचा-“तुम्ही संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून…”, झिरवळांनी केलेल्या कृतीवर Raj Thackeray यांचा टीका)

यावेळी पंतप्रधान मोदींनी स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि मंदिराच्या महत्वाबाबतही चर्चा केली. त्यासोबतच पंतप्रधानांनी वाशिम येथील बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन केले. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते वाशिममध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे 23 हजार 300 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. वाशिमनंतर मोदींचा ठाणे आणि मुंबई दौरा प्रस्तावित आहे. ठाण्यात पंतप्रधान 32,800 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तर मुंबईतील अंदाजे 14,120 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो लाइन-3 च्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) विभागाचे ते उद्घाटन करणार आहेत. (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.