दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याआधी फटाक्यांची विक्री तसेच निर्मिती प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र दरवर्षी दिवाळीच्या सणात मिळणाऱ्या फटाक्यांवर (Firecrackers) हिंदू देवी-देवतांची चित्रे, नावे असतात. त्यामुळे हिंदू (Hindu) देवतांची बदनामी होत असते. लक्ष्मी बॉम्ब यासारखी देवीदेवतांची नावे व छायाचित्र वेष्टनावर छापली जातात. ग्राहकही मोठ्या संख्येने या प्रकाराकडे आकर्षित होतात. मात्र देवतांच्या प्रतिमा असलेले फटाके फोडताना या प्रतिमांचे नकळतपणे अवमूल्यन होत असल्याकडे सर्वांचेच दुर्लेक्ष होते.
( हेही वाचा : Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या)
यामुळेच हिंदु (Hindu) देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांच्या (Firecrackers) विक्रीवर बंदी यावी आणि असे फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निवेदन सकल हिंदू समाज (Sakal Hindu Samaj) यांच्यावतीने भोर येथील अपर तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलिस ठाणे येथे देण्यात आले आहे. याआधी नोव्हेंबर २०२० मध्ये सुद्धा फटाक्यांवरील (Firecrackers) देवीदेवतांची नावे,चित्र यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप याप्रकरणात योग्य तो निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community