Irani Cup 2024 : २७ वर्षांनंतर मुंबईच्या हातात इराणी चषक

Irani Cup 2024 : शेष भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात मुंबईने वर्चस्व राखलं.

131
Irani Cup 2024 : इराणी चषक विजेत्या मुंबईला १ कोटी रुपयांचं बक्षीस
  • ऋजुता लुकतुके

अखेर इराणी चषकाचा (Irani Cup 2024) अंतिम सामना अपेक्षेप्रमाणेच मुंबईने खिशात घातला. सामन्याच्या पाचव्या दिवशी शेष भारताने सर्फराझ (१७) आणि शार्दूल ठाकूर (२) ला झटपट बाद करून काही काळ सामन्यात रंगत निर्माण केली होती. पण, त्यानंतर पहिल्या डावातील मुंबईचा एक तारणहार तनुष कोटियनने दुसऱ्या डावात नाबाद ११४ धावा करून मुंबईची धावसंख्या ३०० च्या पार नेली. त्यामुळे मुंबई आघाडीही ४०० च्या पार गेली. चहापानापूर्वी काही मिनिटं आधी मुंबईने ८ बाद ३२९ वर डाव घोषित केला. तेव्हा शेष भारताला सामन्यात संधीच नसल्यामुळे त्यांनी दुसरा डाव सुरू करण्यापूर्वीच दोन्ही संघांनी मिळून बरोबरी मान्य केली. सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने इराणी चषकावर आपलं नाव कोरलं. १९९७ नंतर पहिल्यांदाच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने या चषकावर आपलं नाव कोरलं.

पाचव्या दिवसाचा हिरो ठरला तो तनुष कोटियन. त्याने प्रथमश्रेणीतील आपलं दुसरं शतक ठोकलं. मुंबईला कोंडीतून बाहेर काढलं. शार्दूल ठाकूर बाद झाला तेव्हा मुंबईची अवस्था ८ बाद १७१ होती. अजून ३०० ची आघाडी व्हायची होती. पण, तनुषने आपला आक्रमक बाणा सोडला नाही. मोहित अवस्थी (नाबाद ५१) सोबत १५८ धावांची नाबाद भागिदारी रचत शेष भारताचं आव्हानच संपवून टाकलं. (Irani Cup 2024)

(हेही वाचा – पोहरागडावर येणारे PM Narendra Modi पहिले!)

पहिल्या डावातही तनुषने सर्फराझच्या मदतीने मुंबईच्या डावाला आकार देण्याचं काम केलं होतं. त्याने ६४ धावा केल्या होत्या. तर आपल्या फिरकीने त्याने ३ बळीही घेतले. आता दुसऱ्या डावात खेळपट्टी खराब होत असताना तनुष पुन्हा एकदा मुंबईच्या मदतीला धावून आला. त्याने ११४ धावा केल्या त्या १५० चेंडूंत.

याशिवाय मुंबईकडून पहिल्या डावांत अजिंक्य रहाणेनं ९७ आणि सर्फराझ खानने तब्बल २२२ धावा केल्या. तर शेष भारताकडूनही अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावा केल्या. आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी सर्फराझ आणि अभिमन्यू यांनी निवड समितीचं लक्ष नक्की वेधलं आहे. (Irani Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.