- प्रतिनिधी
विरार अर्नाळा येथे असणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीसाठी दाखल असलेल्या ४४ वर्षीय रुग्णाला व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी केंद्राच्या व्यवसाथापकासह ६ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Crime)
सईद अहमद हबीब खान (४४) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. जोगेश्वरी पूर्व प्रेम नगर, जनता कॉटर कॉलनी येथे राहणारा सईद खान यांना विरार अर्नाळा येथील ‘पुनर्जीवन फाउंडेशन सत्पाळा’ येथील व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीसाठी दाखल करण्यात आले होते. २ सप्टेंबर रोजी सईद खान हा व्यसनमुक्ती केंद्रातून पळून गेला होता. त्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी यांनी त्याचा शोध घेऊन त्याला मालाड येथून ताब्यात घेतले व व्यसनमुक्ती केंद्रात आणले आणि व्यसनमुक्ती केंद्र चालकासह ५ ते ६ जणांनी त्याला काठी पट्ट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सईद खान हा गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. (Crime)
(हेही वाचा – Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या)
सईद खानच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना कळताच त्यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन ‘पुनर्जीवन फाउंडेशन सत्पाळा’ या व्यसनमुक्ती केंद्राच्या व्यवस्थापकासह ६ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून केंद्राचे व्यवस्थापक नदीम कुरेशी (२८) आणि कर्मचारी सोनू उर्फ भूपेंद्र हुंजन (३४), कुंदन पवार (२४), फरदीन बलोच (२५), फरीद खान (२५) आणि योगेश शेट्टी (५५) यांना अटक करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात यापूर्वी रुग्णांना मारहाण आणि त्यांचा छळ केला जात असल्याच्या तक्रारी देखील नातेवाईकांनी केल्या होत्या. (Crime)
सईद खान हा पळून गेला होता त्यावेळी त्याच्यासोबत आणखी काही रुग्ण पळून गेले होते. केंद्राच्या कर्मचाऱ्यानी त्यांना पकडून त्यांना देखील वायर, चामडी पट्ट्याने मारहाण केल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. पुनर्जीवन फाउंडेशन सत्पाळा या व्यसनमुक्ती केंद्र हे काकडे नावाची व्यक्ती चालवत असून या केंद्रात काम करणारे कर्मचारी हे मुंबई आणि परिसरात राहणारे, या व्यसनमुक्ती केंद्रात मुंबई, ठाणे, पालघर इत्यादी ठिकाणाहून लोक व्यसनमुक्तीसाठी या केंद्रात उपचार घेतात असल्याचे समजते. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community