Congress च्या सभेत महिला नेत्यांचा अपमान, सेलजांनी देखील पक्षातील नेत्यांना सुनावले खडे बोल

133
विदर्भातील जागा कमी करणे, Congress ला पडू शकते अडचणीचे ?
  • प्रतिनिधी 

खरं तर शनिवारी हरियाणामध्ये मतदान सुरु आहे. राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र काँग्रेसच्या (Congress) सभेतील एका व्हिडिओने काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडविली आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसच्या सभेत ज्येष्ठ नेत्यांकडून महिला नेत्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसून येत आहे. यामुळे या प्रकरणाची चर्चा हरियाणापासून तर दिल्लीपर्यंत चांगलीच रंगली आहे.

हरियाणात काँग्रेसच्या (Congress) मंचावर एका महिला नेत्याचा विनयभंग करण्यात आला. यावेळी तेथे उभ्या असलेल्या अन्य एका नेत्याने हा प्रकार रोखला. छेडछाडीमुळे महिला नेत्या अत्यंत अस्वस्थ आणि संतप्त दिसल्या. ही घटना घडली तेव्हा रोहतकचे काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डाही मंचावर उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ३ सप्टेंबर रोजी नारनौंडमध्ये झालेल्या रॅलीचा आहे.

ज्या स्टेजवर छेडछाड झाली ती सभा काँग्रेस (Congress) उमेदवार जस्सी पेटवाड यांची होती. काँग्रेसने येथून सेलजा यांचे निकटवर्तीय अजय चौधरी यांचे तिकीट रद्द करून हुड्डा गटाशी संबंधित जस्सी पेटवाड यांना दिले आहे. या घटनेवर सिरसाच्या खासदार कुमारी सेलजा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना निंदनीय असून, त्यावर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Nashik Tourist Places: नाशिकमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे शोधताय, तर ‘इथे’ वाचा)

काय आहे व्हिडिओमध्ये

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नेत्या स्टेजवर दीपेंद्र हुड्डा यांच्या शेजारी उभ्या आहेत. दीपेंद्र हुड्डा यांनी घातलेली पगडी काढली, तेव्हा महिला नेत्याने त्यांचे स्वागत केले. यावर दीपेंद्र हुड्डाही उत्तर देतात. यानंतर दीपेंद्र दुसऱ्या बाजूच्या नेत्याशी बोलू लागतात.

तेव्हा स्टेजवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हात पुढे केला आणि महिला नेत्याला स्पर्श करण्यास सुरुवात केली. तीही हे पाहते. ती नेत्याकडे रागावून पाहते तेव्हा तिच्या शेजारी उभा असलेला दुसरा नेता तिला थांबवतो. तो महिला नेत्यालाही शांत राहण्याचे संकेत देतो. यावर महिला नेत्या चांगलीच संतापलेली दिसत आहेत.

कुमारी सेलजा यांनी पीडित महिला नेत्याशी संवाद साधला आहे. तिथे तिचा विनयभंग झाल्याचे मला सांगत असल्याचे सेलजा यांनी सांगितले. आज जर महिलेच्या बाबतीत असे घडले तर यापेक्षा वाईट आणि निंदनीय काय असू शकते. यावर कारवाई करावी. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.