‘लुटारू कॉंग्रेसपासून सावधान रहा, कारण…’ PM Narendra Modi यांचे महाराष्ट्रातून जनतेला आवाहन 

100
महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 
महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवार (०५ ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मोदींनी वाशिममध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि उद्घाटन केले. यासोबतच पीएम किसान सन्मान निधीचा १८वा हप्ताही जारी करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित करताना “काँग्रेसला (Lutaru Congress) फक्त लुटणं माहीत आहे. गरिबांना गरीब ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा” असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.     (PM Narendra Modi)

वाशिमच्या सभेत जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi Washim Sabha) निशाणा साधन म्हणाले की, “काँग्रेसला फक्त लुटणं माहीत आहे. गरिबांना गरीब ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. आपली एकताच समाजाला वाचवेल. महाराष्ट्रातील लोकांना काँग्रेसचा आणखी एक कारनामा सांगायचा आहे. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल. दिल्लीमध्ये हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडलं. दु:खद गोष्ट म्हणजे त्याचा म्होरक्या काँग्रेसचा (Congress) नेता निघाला.” अशा परखड शब्दात पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर टीका केली.  (PM Narendra Modi)

 (हेही वाचा – महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे – Pankaja Munde)

पंतप्रधान मोदी म्हणाले, वाशीमच्या या पवित्र भूमीतून मी पोहरा देवी (Pohra Devi) मातेला वंदन करतो, नवरात्रीच्या काळात माता जगदंबेच्या मंदिरात आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला लाभले, तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले आहेत. या व्यासपीठावरून मी या दोन महान संतांना माथा टेकवून आदरांजली अर्पण करतो. ‘आज महान योद्धा आणि गोंडवाना राणी दुर्गावती यांची जयंती आहे’. मागच्या वर्षी देशाने त्यांची ५०० वी जयंती साजरी केली, मी राणी दुर्गावती यांना विनम्र अभिवादन करतो. नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर, मला पीएम किसान सन्मान (PM Kisan Samman) निधीचा १८वा भाग रिलीज करण्याची नुकतीच संधी मिळाली. आज देशातील ९५०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.   

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.