Gold Price : सोनं ८०,००० तर चांदी १ लाखांच्या वर जाण्याच्या वाटेवर

Gold Price : सणासुदीचे दिवस आणि इस्रायल युद्धाचा परिणाम म्हणून मौल्यवान धातूचे दर वाढत आहेत.

145
Gold Price : सोनं ८०,००० तर चांदी १ लाखांच्या वर जाण्याच्या वाटेवर
  • ऋजुता लुकतुके

देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यातच इस्त्रायल आणि इराणवर जमा झालेले युद्धाचे ढग यामुळे सोनं आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. भारतात सोन्याच्या किमती प्रती १० ग्रॅम ८०,००० रुपयांच्या मार्गावर आहेत. तर चांदीही लवकरच १,००,००० रुपयांची किंमत गाठण्याची लक्षणं आहेत. शुक्रवारी रात्री सोनं १५० रुपयांनी महागलं आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्यासाठी आता ७८,४५० रुपये मोजावे लागत आहेत. हा सोन्याचा आत्तापर्यंतचा विक्री दर आहे. दुसरीकडे या शर्यतीत चांदी देखील मागे नाही. शुक्रवारी चांदीच्या दरात १०३८ रुपयांची वाढ झालीय. त्यामुळं प्रतिकिलो चांदीचा दर हा ९४,२०० रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Price)

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून प्रचंड मागणी असल्याने ही वाढ दिसून आली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ७८,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. नवरात्रीच्या काळात सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात ही वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही डिसेंबर सोन्याचा भाव १३१ रुपयांनी वाढून ७६,३७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हे देखील त्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ आहे. सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे सोन्याच्या दराने जुना विक्रम मोडला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, सणासुदीच्या काळात ज्वेलर्सकडून वाढत्या मागणीमुळे ही वाढ दिसून आली आहे. एमसीएक्सवरही सोन्या-चांदीत वाढ झाली आहे. तसेच पश्चिम आशिया खंडात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या दरावर झाला आहे. तसेच जागतिक व फेडरल रिझर्व्ह बँकांनी कमी केलेला व्याजदराचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या भावात तेजी बघायला मिळत आहे. (Gold Price)

(हेही वाचा – Hockey League : हॉकी इंडिया लीगच्या पुनरुज्जीवनासाठी हॉकी इंडिया करणार ३,६४० कोटी रुपये खर्च)

चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ होत आहे. चांदीचे दर हे १ लाख रुपये प्रति किलोच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. सध्या चांदीला देखील मोठी मागणी आहे. आता सणासुदीच्या काळात लोकांच्या मागणीमुळे ज्वेलर्सही जास्त खरेदी करत आहेत. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) वर डिसेंबर चांदीचे दर २१९ रुपयांनी वाढून ९३,१९७ रुपये प्रति किलो झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरातील ही वाढ पुढील आठवड्यातही कायम राहू शकते. ऑक्टोबरमध्ये नवरात्रीनंतर दिवाळीही येत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीची मोठी खरेदी होते. धनत्रयोदशीला सोन्याचा दर नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो, असे मानले जात आहे. (Gold Price)

जागतिक स्तरावर इस्रायल-इराण युद्धामुळेही सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. युद्धजन्य परिस्थितीत हेजिंग म्हणजे सुरक्षित आणि सावध गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. शेअर बाजार आणि इतर जोखमीचे पर्याय दूर सारून लोक सोनं आणि चांदीतील गुंतवणुकीला महत्त्व देतात. कारण सोनं आणि चांदी नाशवंत नाही. इतर गुंतवणुकीची साधनं मात्र अशावेळी तोट्यात जातात. त्यामुळेच गेल्या आठवड्यात इराणने इस्रायलवर एका रात्रीत २०० क्षेपणास्त्र डागल्यावर सोन्याचे दरही एकाच दिवसांत १,००० रुपयांनी वर गेले होते. (Gold Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.