काँग्रेस सर्वात बेइमान आणि भ्रष्ट पक्ष; PM Narendra Modi यांचा घणाघात

98
महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 
महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वाशिम आणि ठाणे येथे विकास कामाचं भूमिपूजन केले असून, मेट्रो मार्ग ३ चे लोकार्पण केले. यावेळी जनतेला संबोधित करताना कॉंग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.  (PM Narendra Modi)

काँग्रेस सर्वात बेईमान व भ्रष्ट पक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस देशाची सर्वात बेईमान व भ्रष्ट पक्ष आहे. कोणताही काळ असो, कोणतेही राज्य असो, काँग्रेसचे चारित्र्य बदलत नाही. तुम्ही मागच्या 1 आठवड्यातील घटना पाहा, काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याचे जमीन घोटाळ्यात नाव आले आहे. त्यांचे एक मंत्री महिलांना शिवीगाळ करत आहेत, त्यांना अवमानित करत आहेत. हरियाणात काँग्रेस नेत्यांना ड्रग्जसह पकडले गेलेत.

(हेही वाचा – शिवसेनेमध्ये जाऊन Nilesh Rane वैभव नाईकांची डोकेदुखी वाढवणार ?)

मोदी पुढे म्हणाले, एकीकडे महायुती सरकार (Mahayuti Sarkar) आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या विकासालाच आपले उद्दीष्ट मानते. तर दुसरीकडे, काँग्रेस व महाविकास आघाडीचे लोक आहेत. त्यांना जेव्हा केव्हा संधी मिळते ते विकासकामांना स्थगिती देतात. महाविकास आघाडीला विकासकामांना केवळ लटकवणे, अडकवणे व भटकवणेच येते. मुंबई मेट्रो स्वतः याची सर्वात मोठी साक्षीदार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांच्या काळात मुंबईत मेट्रो -3 (Mumbai Metro Line 3) च्या कामाला सुरुवात झाली होती. त्याचे 60 टक्के काम त्यांच्या कार्यकाळात झालेही होते. पण त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांनी आपल्या अहंकारात मेट्रोच्या कामाला खिळ घातली. त्यांनी अडीच वर्षांपर्यंत काम अडवून ठेवले. यामुळे या प्रकल्पाची किंमत 14 हजार कोटींनी वाढली. हा पैसा कुणाचा होता? हा पैसा महाराष्ट्राचा नव्हता का? येथील जनतेचा नव्हता? हा पैसा महाराष्ट्राच्या करदात्यांच्या कष्टाचा होता. (PM Narendra Modi)

महाविकास आघाडी ही महाविकास विरोधी आघाडी

पंतप्रधान मोदी म्हणाले, एकीकडे काम पूर्ण करणारी महायुती सरकार आहे, तर दुसरीकडे विकासाला रोखणारे महाविकास आघाडीचे लोक आहेत. महाविकास आघाडीने आपल्या ट्रॅक रेकॉर्डवरून सिद्ध केले आहे की , ते महाविकास विरोधी लोक आहेत. त्यांनी अटलसेतूचा विरोध केला होता. त्यांनी मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठप्प करण्याचा कट रचला. ते सत्तेत असेपर्यंत बुलेट ट्रेनला (Bullet train) पुढे सरकू दिले नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागातील पाण्याशी संबंधित प्रकल्पही सोडले नाही. जे काम महाराष्ट्राच्या जनतेची तहाण भागवण्यासाठी सुरू झाले होते, ते काम महाविकास आघाडीने ते कामही अडवून ठेवले होते. ते सर्वकाम अडवून ठेवत होते. आता तुम्हाला त्यांना अडवायचे आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या या शत्रूना सत्तेबाहेरच अडवायचे आहे. शेकडो मैल दूर ठेवायचे आहे.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.