पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवार (०५ ऑक्टोबर) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पोहोचले. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, “हिमाचल प्रदेशातील काँग्रेस (Himachal Pradesh Congress) सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत. हिमाचलमधील काँग्रेस सरकारने शौचालय कर लावला आहे. एकीकडे मोदी शौचालये बांधा म्हणत आहेत आणि दुसरीकडे आम्ही शौचालयांवर कर म्हणत आहोत. लादणार म्हणजे काँग्रेस हे लूट आणि फसवणुकीचे पूजनीय पॅकेज आहे. जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस हा भारतातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष आहे. गेल्या आठवड्यात जमीन घोटाळ्यात काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले होते. त्यांच्या एका मंत्र्याने महिलांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला. हरियाणामध्ये ड्रग्जसह काँग्रेस नेता पकडला. त्यामुळे काँग्रेस लूट, झूट व कुशासनचे पूर्ण पॅकेज आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले
(हेही वाचा – Bhagoji Keer, Nana Shankarsheth Memorial सह मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणांचा महायुतीचा धमाका)
लाडकी बहीण योजनेवरुन महाविकास आघाडीवर टीका
पंतप्रधान मोदींनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात त्यांनी आतापासूनच आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये व 3 सिलिंडर मोफत मिळत आहेत. पण महाविकास आघाडीला ही योजना पचत नाही. त्यामुळे ते सत्तेत आले की सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांना टाळे ठोकतील. पैसा महिलांच्या हातात न जाता आपल्या दलालांच्या हातात जावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे महिलांनी काँग्रेस व महाविकास आघाडीविरोधात सावध राहण्याची गरज आहे.
(हेही वाचा – काँग्रेस सर्वात बेइमान आणि भ्रष्ट पक्ष; PM Narendra Modi यांचा घणाघात)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले सरकार विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मी एक आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Marathi classical language) दर्जा दिला आहे. हा केवळ मराठी भाषा व महाराष्ट्राचा सन्मान नव्हे तर देशाला ज्ञान, दर्शन, आध्यात्म व साहित्याची समृद्धी देणाऱ्या परंपरेचा सन्मान आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community