SBI Fake Branch : या गावात स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून चोरांनी घातला लाखोंचा गंडा

SBI Fake Branch : हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

216
SBI Fake Branch : या गावात स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून चोरांनी घातला लाखोंचा गंडा
  • ऋजुता लुकतुके

भारतात छत्तीसगड इथं एक विचित्र बँक घोटाळा समोर आला आहे. इथं आधुनिक चोरांच्या एका टोळीने छापोरा नावाच्या एका खेड्यात चक्क स्टेट बँकेची बनावट शाखाच उघडली. बँकेत कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि काही बँकिंग व्यवहारांच्या निमित्ताने या भामट्यांनी गावकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. संघटित आर्थिक गुन्हेगारीची ही घटना असून पोलिसांना अजून ही टोळी सापडलेली नाही. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून २५० किलोमीटर अंतरावर साकती जिल्ह्यातील हे एक खेडं आहे. (SBI Fake Branch)

(हेही वाचा – इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करावेत; Donald Trump यांचा इस्रायलला सल्ला)

या बनावट बँकेच्या शाखेच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन अनेकांना नोकऱ्या दिल्या होत्या. मनोज अग्रवाल नावाची व्यक्ती अर्ज करण्यासाठी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. कोरबा व छापोरा येथील अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. (SBI Fake Branch)

(हेही वाचा – बारामती विधानसभा न लढवता काकांसमोर Ajit Pawar खेळत आहेत नवी खेळी ?)

दरम्यान, या घटनेतील गुन्हेगारांनी अत्यंत सावधपणे योजना आखून ही फसवणूक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची बनावट शाखा तयार केली. या घोटाळ्यामध्ये बेकायदेशीर नियुक्ती, बनावट प्रशिक्षण सत्रे, बेरोजगार व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक करण्यासाठी विस्तृत सेटअप तयार करण्यात आला होता. (SBI Fake Branch)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.