Pune RTO : दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

58
Pune RTO : दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल. (Pune RTO)

(हेही वाचा – Beach Cleaning : वर्सोवा आणि वर्सोवा विस्तार चौपाटीच्या स्वच्छतेसाठी पावसाळ्यात प्रतिदिन नेहमीपेक्षा ६० ते ६५ टक्के वाढतो खर्च)

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त अर्जाचा लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डोडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोवाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ., पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. (Pune RTO)

(हेही वाचा – इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करावेत; Donald Trump यांचा इस्रायलला सल्ला)

नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पसंती क्रमांकाची वैधता संपुष्टात येते. परंतु, आता एनआयसी संकेतस्थळामार्फत या प्रक्रियेमध्ये बदल झाला असून वैधता संपलेले पसंती क्रमांक हे नागरिकांना पसंती क्रमांकाच्या संकेतस्थळावर उपलव्ध असल्याचे दिसतात. सहायक रोखपाल यांच्याकडे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य’ या तत्वानुसार अर्ज करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीला पसंती क्रमांक जारी करण्यात येत आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज, चुकीच्या रकमेचा डीडी जोडलेले तसेच अचूक मोबाईल क्रमांक न लिहिलेले अर्ज बाद ठरविण्यात येतील. पसंती क्रमांकाकरिता महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार सुधारित शुल्क लागू राहील. तथापि, वरील कालावधीमध्ये व पुढे त्यावेळी अस्तित्वात असलेले शुल्क लागू राहणार असल्याचेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे. (Pune RTO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.