Diwali Faral : परदेशातल्या आप्तेष्टांना टपाल खात्यामुळे स्वस्त दरात पाठवता येणार दिवाळी फराळ

57
Diwali Faral : परदेशातल्या आप्तेष्टांना टपाल खात्यामुळे स्वस्त दरात पाठवता येणार दिवाळी फराळ

भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुख,समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ… (Diwali Faral) लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरंच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना या मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. मात्र या विदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलेला आहे.

ठाणे विभागातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने भारताचे नाव उंचावत आहेत. दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ (Diwali Faral) कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. यांचे उत्तर ठाणे डाक विभागाने शोधून काढले आहे. डाक विभागाच्या ठाणे विभागाने यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही खास पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकींग काऊंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

(हेही वाचा – BJP च्या उमेदवार निवड प्रक्रियेबाबत पक्षातच नाराजीचा सूर!)

डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, ITPS या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे दर खाजगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत. ठाणे डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता पालक वर्ग आपल्या विदेशातील मुला-मुलींना तसेच प्रियजनांना खास घरघुती आणि भारतीय बनावटीचे फराळ (Diwali Faral) पाठवू शकणार आहेत.

या सुविधेचा लाभ ठाणे डाक विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन समीर महाजन, वरिष्ठ अधीक्षक, ठाणे डाक विभाग यांनी केले आहे. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खाजगी सेवांपेक्षा कमी आहेत. जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ (Diwali Faral) पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.

(हेही वाचा – ‘काँग्रेस ही लूट व फसवणुकीचे पूर्ण पॅकेज’; PM Narendra Modi यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल)

या पोस्ट ऑफिसेस मध्ये पॅकेजींग व विशेष काऊंटर सेवा उपलब्ध आहे –
  • ठाणे हेड पोस्ट ऑफिस
  • कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस
  • कल्याण आर एस पोस्ट ऑफिस
  • डोंबिवली पोस्ट ऑफिस
  • अपना बाजार पोस्ट ऑफिस
  • विष्णू नगर पोस्ट ऑफिस
  • अंबरनाथ पोस्ट ऑफिस

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.