भारताने शनिवारी स्वदेशी बनावटीच्या व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम (VSHORADS) क्षेपणास्त्राची यशस्वी केली. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात पोखरण फायरिंग रेंजवर ही चाचणी घेण्यात आली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (Air Defense Systems)
या क्षेपणास्त्राच्या तब्बल 3 यशस्वी चाचण्यांनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि प्रकल्पात सहभागी असलेल्या खाजगी उद्योगांचे अभिनंदन केले आहे. व्हेरी शॉर्टरेंज एअर डिफेन्स सिस्टीम (VSHORADS) ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली चौथ्या पिढीतील सूक्ष्म शस्त्र प्रणाली आहे. या क्षेपणास्त्राची खासियत म्हणजे त्याची अचूकता आणि कमी पल्ल्यात अत्यंत जलद प्रतिसाद, ज्यामुळे ते हवाई संरक्षणासाठी आवश्यक यंत्रणा बनले आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूची विमाने, ड्रोन आणि इतर हवाई धोक्यांना कमी अंतरावर लक्ष्य करण्यास सक्षम आहे. डीआरडीओने अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते उच्च गतिशीलता आणि अचूकतेसह लक्ष्यावर हल्ला करू शकते. (Air Defense Systems)
(हेही वाचा – illegal number Plate : २८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर ‘दादा, मामा’!)
हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी उपयुक्त
भारतीय सशस्त्र दल काही काळ रशियाने विकसित केलेल्या इग्ला क्षेपणास्त्र प्रणालीवर अवलंबून होते परंतु आता ते VSHORADS द्वारे बदलले जाऊ शकते. ही नवीन संरक्षण यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून विकसित होत होती आणि आता ती लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज मानली जात आहे. VSHORADS प्रकल्पात खाजगी क्षेत्रानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या क्षेपणास्त्राच्या विकासात आणि उत्पादनात 2 खासगी कंपन्यांचा सहभाग असून हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनले आहे. (Air Defense Systems)
या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय सशस्त्र दलांना अधिक बळकट करेल आणि शत्रूच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी उपयुक्त ठरेल. या क्षेपणास्त्राच्या सामर्थ्यामुळे भारताची संरक्षण यंत्रणा आणखी मजबूत होईल. यासोबतच, त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि प्रादेशिक स्थिरता आणि सामूहिक सुरक्षेला प्रोत्साहन देणे हे भारताचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. (Air Defense Systems)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community