- प्रतिनिधी
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनांशी संबंधित देशातील पाच राज्यात २६ ठिकाणी शनिवारी छापेमारी केली. जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीसह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही छापेमारी करण्यात आली.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना या ठिकाणी एनआयए आणि राज्य एटीएसने छापेमारी करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. जालन्यातील गांधी नगर परिसरातून दोन जणांना पकडण्यात आले, तर एकाला छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौक परिसरातून आणि दुसऱ्या संशयिताला एन-६ परिसरातून ताब्यात घेण्यात आले, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. याशिवाय इतर अनेक संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. झडतीदरम्यान, एनआयएच्या पथकाने महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पॅम्प्लेट्स आणि मासिके जप्त केली.
(हेही वाचा – Hindalco Industries : धातू उद्योगातील आघाडीची कंपनी हिंदाल्कोची मुख्य उत्पादनं कोणती?)
आसाम, महाराष्ट्र, यूपी, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर राज्यातील २६ ठिकाणी छापा टाकल्यानंतर शेख सुलतान सलाह उद्दीन अयुबी @ अयुबी याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला कट प्रकरणी अटक करण्यात आली. त्याला नवी दिल्ली येथील पटियाला हाऊस येथील एनआयएच्या (NIA) विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित संशयिताकडून देशातील तरुणांची माथे भडकावून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात गुंतले होते आणि दहशतवादाशी संबंधित प्रचार प्रसारित करण्यात गुंतले होते. आणि कट्टरपंथी बनवण्यात आणि तरुणांना जैश-ए-मोहम्मदने प्रेरित केलेल्या जमात संघटनेत भरती करण्यात गुंतले होते. हे संशयित तरुणांना भारतभर हिंसक दहशतवादी हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात येत होते अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या (NIA) तपासात समोर आली आहे. २ ऑक्टोबर रोजी, राजस्थानमधील हनुमानगड रेल्वे स्थानकावर एक पत्र प्राप्त झाले ज्यामध्ये राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवर आणि इतर ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. हे पत्र हनुमानगड रेल्वे स्टेशन मास्तरला पोस्टाने पाठविण्यात आले होते.
(हेही वाचा – Pune RTO : दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार)
“जैश-ए-मोहम्मदच्या नावाने लिहिलेल्या पत्रात ३० ऑक्टोबरला गंगानगर, हनुमानगड, जोधपूर, बिकानेर, कोटा, बुंदी, उदयपूर, जयपूर येथील रेल्वे स्थानके आणि इतर ठिकाणे बॉम्बने उडवून दिली जातील असे पत्रातून धमकी देण्यात आली होती. या अनुषंगाने एनआयए (NIA) आणि एटीएसने देशभरातील ५ राज्यातील २६ ठिकाणी छापे मारी केल्याचे समोर आले आहे. जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे, या संघटनेने २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community