Israel ने मागितली भारताची माफी, चूकही सुधारली; काय आहे कारण ?

128
Israel ने मागितली भारताची माफी, चूकही सुधारली; काय आहे कारण ?
Israel ने मागितली भारताची माफी, चूकही सुधारली; काय आहे कारण ?

इस्रायल (Israel) अधिकृत संकेतस्‍थळावर भारताचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचा प्रकार नुकताच समोर आला. इस्रायलच्या अधिकृत संकेतस्थळावर नकाशावरील जम्‍मू काश्‍मीरचा बराचसा भाग पाकिस्‍तानमध्‍ये (Pakistan) असल्‍याचे दर्शवण्‍यात आले होते. ही गोष्‍ट भारतीय नागरिकांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट करून त्‍याचा जाहीर निषेध केला.

(हेही वाचा – भारताकडून Air Defense Systems ची यशस्वी चाचणी)

त्‍यानंतर इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अजार यांनी यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करत संकेतस्‍थळाच्‍या संपादकाच्‍या चुकीमुळे असे झाल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच ‘आम्‍ही तो नकाशा संकेतस्‍थळावरून लगेच हटवला आहे. ही गोष्‍ट आमच्‍या निदर्शनास आणून दिल्‍याबद्दल धन्‍यवाद’, असेही ते म्‍हणाले.

एका भारतीय नागरिकाने ‘एक्‍स’द्वारे नकाशाचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्‍यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती. त्‍याने म्‍हटले होते की, इस्रायलच्‍या हमास, हिजबुल्ला, तसेच इराण यांच्‍यासमवेत चालू असलेल्‍या संघर्षात भारत इस्रायलबरोबर उभा आहे. असे असले, तरी इस्रायल भारताबरोबर आहे का ? इस्रायलच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावरील भारताचा हा नकाशा पहा. यामध्‍ये जम्‍म-काश्‍मीरकडे पहा. हा विषय सर्वत्र पसरला. भारतियांनी त्‍याला मोठ्या प्रमाणात विरोधही केला. ही गोष्‍ट इस्रायलच्‍या लक्षात येताच, त्‍याने त्‍यावर क्षमायाचना करून चुकीचा नकाशा संकेतस्‍थळावरून त्‍वरित हटवला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.